बदलापुरात मोठा राडा; भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, कार्यालयही फोडलं, VIDEO

badlapur politics : बदलापुरात मोठा राडा झालाय. भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडलीये .
badlapur politics
badlapur news Saam tv
Published On
Summary

कल्याणनंतर बदलापुरात मोठा राडा

भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

मयुरेश कडव, साम टीव्ही

बदलापुरात नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर राडा सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. भाजप कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याने शहरातील राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नयन मुठे असे मारहाण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. भाजपचे नयन मुठे यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. आगरआळीतील त्यांच्या कार्यालयाचीही तोडफोड करण्यात आलीय. मारहाणीचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय. ही मारहाण सुरज मुठे आणि त्यांच्या साथीदारांनी केल्याचा आरोप नयन मुठे यांनी केलाय.

badlapur politics
बीएमसीत मुस्लीम फॅक्टर महत्वाचा ठरणार? मुस्लीम उमेदवार, कुणाचं गणित बिघडवणार?

सुरज मुठे आणि नयन मुठे हे दोघेही भाजपचे कार्यकर्ते आहेत. या निवडणुकीत सूरज मुठे यांचा पराभव झाला. आपल्या विरोधात नयन मुठे यांनी काम केल्याचा राग मनात धरून सूरज मुठे आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केल्याचं नयन मुठे यांचं म्हणणं आहे.

सध्या पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे बदलापुरातलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा गढूळ झालंय. या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात, हे पाहावे लागले.

badlapur politics
ZP Election : २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात, निवडणुकीची घोषणा कधी होणार? जाणून घ्या

कल्याण–डोंबिवलीतही हाणामारीची घटना

कल्याण–डोंबिवलीतही दोन गटात राडा झाल्याची घटना घडली. डोंबिवली पूर्वेतील तुकारामनगर परिसरात भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला.ही घटना पॅनल क्रमांक २९ मधील प्रचाराच्या पार्श्वभूमीवर घडली. या पॅनलमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात युती नसल्यामुळे दोन्ही पक्ष आमनेसामने आलेत. भाजपकडून कविता म्हात्रे, आर्या नाटेकर, मंदार टावरे, अलका म्हात्रे रिंगणात आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून रूपाली म्हात्रे, रंजना पाटील, नितीन पाटील आणि रवी पाटील हे उमेदवार रिंगणात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com