ऐन निवडणुकीत राज्यात पैशांचा पाऊस; निवडणूक अधिकाऱ्यांनी २ दिवसांत ९०००००० रुपयांची रोकड पकडली

maharashtra municipal corporation election : ऐन निवडणुकीत राज्यात मतदानाच्या आदल्या दिवशी ७० लाखांची रोकड सापडली. तर उल्हासनगरमध्ये २० लाखांची रोकड पकडण्यात आली होती.
municipal corporation election update
municipal corporation electionSaam tv
Published On
Summary

राज्यात काही ठिकाणी पैशांचा पाऊस

अकोल्यात ५० लाखांची रोकड जप्त करण्यात आलीये

राज्यात दोन दिवसांत सापडले ९० लाखांची रोकड

राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात पैशांची वाटप होत आहे. या पैशांची वाटपावरून उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्या हाणाणारीच्या देखील घटना होत आहेत. मतदानाच्या आदल्या दिवशी देखील अकोल्यात ५० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सीबीडी बेलापूरमध्ये २० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तर उल्हासनगरमध्ये काल २० लाखांची रोकड पकडली. निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्यात दोन दिवसांत एकूण ९० लाखांची रोकड जप्त करण्यात आले आहेत.

राज्यात मतदानाच्या आदल्या दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारांच्या कार्यकत्यांकडून पैशांचे वाटप होत असल्याचे आरोप होत आहे. अकोल्यातही रात्री रोकड पकडण्यात आली आहे. अकोल्यातील खदान पोलिसांनी पेट्रोलिंगदरम्यान 50 लाखांची रोकड सापडली.

municipal corporation election update
महापालिका मतदानापूर्वीच खळबळ; शेकडो मतदान कार्डांचा ढीग आढळला, निवडणूक अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

एका तरुण दुचाकीने कापड्याच्या पिशवीमध्ये पैसे घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर खदान पोलिसांनी गौरक्षण रोड परिसरात ही कारवाई केली आहे.. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे. पुढील पंचनामा सुरू आहे. यश लालवानी असं पकडण्यात आलेल्या तरुणाच नाव आहे.

बेलापूरमध्ये पकडले २० लाख रुपये

सीबीडी बेलापूर येथे रोकड पकडण्यात आली. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल २० लाख रुपये पकडण्यात आले. सीबीडी बेलापूर येथील कोंकण भवन सर्कलवर गाडी चेक करताना गाडीत २० लाख रूपये भेटले. मिळालेल्या रोकड प्रकरणी तपास सुरू आहे.

municipal corporation election update
महापालिका मतदानापूर्वीच खळबळ; शेकडो मतदान कार्डांचा ढीग आढळला, निवडणूक अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

उल्हासनगरमध्ये सापडली २० लाखांची रोकड

उल्हासनगरमध्ये 18 ते 20 लाखांची रोकड पकडली आहे. अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड यांनी पाठलाग करून ही रोकड पकडली. उमेदवाराने सुभाष टेकडी चौकात रिक्षा पकडली. या प्रकरणी रिक्षा चालक आणि रोकड पोलिसांच्या ताब्यात घेतली. एका रिक्षात रोकड आढळली असून महानगरपालिकेसमोर असलेल्या भाजप प्रवक्ते प्रदीप रामचंदानी आणि यांच्या कार्यालयातून ही केस निघाल्याचे नरेश गायकवाड यांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com