Municipal Election : भाजपच्या पोलिंग एजंटकडून आचारसंहितेचा भंग, मीरा रोडमध्ये सकाळी नेमकं काय झालं?

Mira Bhayandar Municipal Election : मीरा रोड प्रभाग क्रमांक २० मध्ये मतदानाच्या दिवशी आचारसंहितेचा भंग झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पोलिंग एजंटांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Municipal Election : भाजपच्या पोलिंग एजंटकडून आचारसंहितेचा भंग,  मीरा रोडमध्ये सकाळी नेमकं काय झालं?
Mira Bhayandar Municipal ElectionSaam Tv
Published On
Summary
  • मीरा रोडमध्ये मतदानाच्या दिवशी आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप

  • प्रभाग क्रमांक २० मधील मतदान केंद्रात गंभीर प्रकार

  • भाजप पोलिंग एजंटांनी नावाचे बॅच लावल्याचा आरोप

  • निवडणूक आयोगाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष

राज्यात सर्वत्र २९ महापालिकेंच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या निवडणुकीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच मुंबईतील मीरा रोड मधून मोठी बातमी समोर आली आहे. मिरा रोड प्रभाग २० मध्ये आचारसंहितेचा भंग करण्यात आला आहे. याप्रकरणी आता कारवाई करण्यात येणार आहे.

मिरा रोड येथील प्रभाग क्रमांक २० मधील शांतीनगर प्री-प्रायमरी शाळा, सेक्टर ५ येथे मतदानाच्या दिवशी आचारसंहितेचा भंग झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. भाजपा उमेदवारांच्या वतीने नेमण्यात आलेल्या पोलिंग एजंटांनी स्वतःची नावे असलेले बॅच लावून मतदान केंद्रात उपस्थिती लावल्याचा प्रकार समोर आले आहे.

Municipal Election : भाजपच्या पोलिंग एजंटकडून आचारसंहितेचा भंग,  मीरा रोडमध्ये सकाळी नेमकं काय झालं?
Badlapur : बदलापूर स्वीकृत नगरसेवक प्रकरणात नवा ट्विस्ट, भाजपच्या नव्या उमेदवारावर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदान केंद्राच्या आवारात कोणत्याही प्रकारे उमेदवाराचे नाव, पक्षचिन्ह किंवा प्रचारासारखी ओळख दर्शवणारे साहित्य वापरण्यास सक्त मनाई आहे. मात्र, संबंधित भाजपा उमेदवारांच्या पोलिंग एजंटांनी नाव असलेले बॅच लावून बसल्याने हा प्रकार थेट आचारसंहितेचा भंग असल्याचे मनसेने आरोप केला आहे.

याप्रकरणी आता काय कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान राज्यात ठिकठिकाणी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून उद्या २९ महापालिकांवर कोणाचा विजयाचा झेंडा फडकणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com