कामाची बातमी! अतिक्रमणं करून बांधलेली घरं नियमित होणार, पण...फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

PM Awas Yojana eligibility criteria : २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित करण्यात आले आहे. ५०० चौ. फुटांपर्यंत मोफत मालकी हक्क देण्यात येणार आहे. पण त्यासाठी पात्रता, अटी आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्येऊयात..
Devendra Fadanvis News
Devendra Fadanvis NewsSaamTv
Published On

Encroachment regularization Maharashtra Chandrashekhar Bawankule revenue policy : राज्यातील लाखो गरीब आणि गरजू कुटुंबांचा निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मोठा निर्णय घेतला. २०११ पर्यंत झालेली व सध्या केवळ निवासासाठी अस्तित्वात असलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.

या निर्णयानुसार, कोणत्याही परिस्थितीत भारताचा नागरिक नसलेल्या व्यक्तीचे अतिक्रमण नियमित होणार नाही. याची दक्षता अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्याने घ्यायची आहे. असे अतिक्रमण आढळल्यास पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तथापि, हा निर्णय मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा वगळून संपूर्ण राज्यासाठी लागू आहे. या आदेशानुसार, ५०० चौरस फुटांपर्यंतचे निवासी अतिक्रमण पूर्णपणे विनामूल्य नियमानुकूल करण्यात येणार आहे. तर उर्वरित क्षेत्रासाठी प्रचलित बाजारमूल्याच्या केवळ दहा टक्के रक्कम कब्जेहक्काची रक्कम म्हणून आकारली जाईल.

Devendra Fadanvis News
Ladki Bahin Yojana : ना ₹६००० ना ₹४५००, लाडक्या बहिणींच्या खात्यावर १५०० जमा; आताच बॅलेन्स चेक करा, आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची अपडेट

नदीपात्र, नाले, गायरान, सार्वजनिक रस्ते, वने, स्मशानभूमी, खेळण्याचे मैदान किंवा शाळा/रुग्णालयासाठी आरक्षित असलेल्या जमिनींवरील अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत नियमित केली जाणार नाहीत. अशा बाधित कुटुंबांना 'प्रधानमंत्री आवास योजने'तून पर्यायी घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Devendra Fadanvis News
Pune Fire : पुण्यात पेट्रोल पंपाला भीषण आग, परिसरात जिकडे तिकडे धुराचे लोट, पाहा नेमकं झालं काय?

सर्वांसाठी घरे' हे धोरण आणि 'विकसित महाराष्ट्र २०४७' चे उद्दिष्ट गाठण्यासाठी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यामुळे वेगवेगळ्या शासन मान्यतेची गरज पडणार नाही. या समित्याच निर्णय घेतील. जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १७ सदस्यांची समिती असून, विधानसभा क्षेत्रनिहाय आमदारांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापण्यात येणार आहेत.

Devendra Fadanvis News
कल्याणजवळ भयंकर अपघात, मेलखाली व्यक्तीचा मृत्यू; इंजिनमध्ये अडकले मृतदेहाचे तुकडे, मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली
राज्यातील एकही गरजू कुटुंब निवाऱ्याविना राहू नये, ही सरकारची भूमिका असल्याने, एक जानेवारी २०११ पर्यंतची अतिक्रमणे नियमानुकूल करून आम्ही गरीब व गरजू कुटुंबांना दिलासा दिला आहे. यामुळे लाखो कुटुंबांच्या आयुष्यात स्थिरता येईल. दर तीन महिन्याने या संदर्भातील आढावा घेतला जाईल.
चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री, महाराष्ट्र राज्य
Devendra Fadanvis News
मिल्कशेक मर्डर! बॉयफ्रेंडच्या प्रेमात आंधळी झाली पोलीस मुलगी; जन्मदात्या बापाला संपवलं, हादरवणारा प्लान उघड

अतिक्रमण नियमित करण्यासाठीची पात्रता, अटी व शर्ती, जागेची मर्यादा व शुल्क आकारणी, अंलबजावणीची कार्यपद्धती, अर्जासाठीची मुदत, पडताळणी, अंमलबजावणी यंत्रणा अशी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात येणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्तिगत लक्ष घालून गरीब व गरजूंना घरे मिळावीत यासाठी बैठकी घेतल्या.

प्रमुख वैशिष्ट्ये व अटी

जमीन पती -पत्नी यांच्या संयुक्त नावाने 'भोगवटादार वर्ग-२' म्हणून दिली जाईल.

ग्रामीण तसेच शहरी भागात जास्तीत जास्त १५०० चौ. फुटापर्यंतचे क्षेत्र नियमित

जास्त असलेले अतिक्रमण पाडण्यात येईल.

५०० चौ. फुटापर्यंतची सर्व निवासी अतिक्रमणे पूर्णपणे विनामूल्य नियमित

घराचा काही भाग व्यवसायासाठी वापरत असल्यास, बाजारमूल्याच्या २५% रक्कम

जमिनीच्या नोंदणीसाठी १००० चौ. फुटापर्यंत १००० रुपये शुल्क

१ जानेवारी २०११ पूर्वीच्या वास्तव्यासाठी मतदार यादी, वीज बिल, मालमत्ता पावती ग्राह्य

गेल्या १ वर्षातील रहिवासाचा पुरावा बंधनकारक

Devendra Fadanvis News
Pune : पुण्यात नेमकं चाललंय काय? सासरचा जाच आणि निशासोबतचा वाद, मोहम्मदनं वैतागून केली आत्महत्या

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com