Pune : पुण्यात नेमकं चाललंय काय? सासरचा जाच आणि निशासोबतचा वाद, मोहम्मदनं वैतागून केली आत्महत्या

Pune suicide case : पुण्यातील आंबेगावमध्ये सासरच्या छळाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत्यूपूर्वी व्हिडिओ करून आरोप केल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.
Pune man suicide due to in-laws harassment case
Pune man suicide due to in-laws harassment caseSaam TV Marathi
Published On

Pune man suicide due to in-laws harassment case : सासरच्या जाचाला कंटाळून तरूणाने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. रिक्षात उंदीर मारण्याचे औषध खाऊन तरूणाने आयुषाचा दोर कापला. पुण्यातील आंबेगाव परिसरात ही घटना घडली. मोहम्‍मद साद आसीफ सय्यद असे आत्‍महत्‍या केलेल्‍या तरूणाचे नाव आहे. मोहम्मद सय्यद याने आत्महत्या करण्याआधी एक व्हिडिओ करून मित्राला पाठवला होता. याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करीमुन्निशा उर्फ निशा खान, सर्वर उर्फ कैफकमरू खान, रेश्मा कमरू खान, शमा जावेद शेख, जावेद शेख, अथर्व काळे आणि इशीता यांच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. आंबेगाव पोलिसांनी पत्नीसह इतरांवर गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद साद मुळचा मालेगाव या जिल्ह्याचा होता. एक वर्षापूर्वी त्याचे पुण्यातील तरुणीसोबत विवाह झाला होता. विवाहानंतर तो जांभुळवाडी वास्तव्यास होता. तसेच रिक्षा चालवून आपल्‍या घरातील उदरनिर्वाह चालवत होता. परंतु, किरकोळ कारणावरून पती पत्‍नीमध्ये वाद होत होते. यातून सासरच्‍यांकडून त्रास होत होता, असे समोर आले आहे.

Pune man suicide due to in-laws harassment case
Pune : मोठी बातमी! पुण्याला मिळाला ४ पदरी उन्नत महामार्ग, तळेगाव-चाकणची वाहतूककोंडी कायमची संपणार

वारंवार होणारा मानसिक त्रास सहन न झाल्‍याने साद ने जीवन संपवण्याचे ठरवले. त्याने त्याच्या मोबाईलवर एक व्हिडीओ तयार करून त्या व्हिडीओत आपण पत्नीसह इतरांच्‍या त्रासाला कंटाळून आत्‍महत्‍या करत असल्‍याचे म्‍हटले. नंतर तो व्हिडीओ त्‍याने आपल्‍या एका मित्राला पाठवला. ७ मार्च रोजी साद ने कात्रज येथील संतोषनगर येथे रिक्षा पार्क करून उंदीर मारण्याचे औषध प्राषण करून आत्‍महत्‍या करण्याचा प्रयत्‍न केला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, १२ मार्च रोजी उपचारा दरम्यान त्‍याचा मृत्‍यू झाला.

Pune man suicide due to in-laws harassment case
Kharat Case : भोंदू खरातच्या संपर्कात आमदाराची बायको, ती कोण? चर्चेनं महाराष्ट्रात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com