Pune : मोठी बातमी! पुण्याला मिळाला ४ पदरी उन्नत महामार्ग, तळेगाव-चाकणची वाहतूककोंडी कायमची संपणार

Talegaon to Chakan 4 lane elevated highway project details : पुण्यात तळेगाव ते चाकण दरम्यान ४ पदरी उन्नत महामार्गाला मंजुरी. वाहतूककोंडी कमी होऊन औद्योगिक विकासाला चालना मिळणार. सविस्तर माहिती वाचा.
Mumbai Pune New Highway
Mumbai Pune New HighwaySaam tv
Published On

Pune Infrastructure Projects Latest Update News : पुण्यातील तळेगाव आणि चाकणमध्ये होणाऱ्या वाहतूककोंडीवर कामयचा तोडगा काढण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पुणे जिल्ह्यात ४ पदरी नव्या उन्नत महामार्गाला मान्यता दिली आहे. पायाभूत सुविधा समिती बैठक संपन्न झाली, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सुलभ दळणवळणासाठी महामार्गाचे जाळे विकसित करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये पुण्याला नवा उन्नत मार्ग मिळाला आहे.

पुणे जिल्ह्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे येथे निश्चितच औद्योगिक विकासास मदत होणार आहे. पुणे शहर परिसराची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी महामार्गाची कामे होणे अत्यंत गरजेचे आहे. राज्यातील दळणवळण अधिक सुलभ होण्यासाठी महामार्गाचे जाळे विकसित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. पुणे जिल्ह्यात तयार होणाऱ्या नव्या उन्नत महामार्गामुळे वाहतूककोंडीची कटकट कायमची संपणार आहे.

Mumbai Pune New Highway
लोकलला अचानक मोठा झटका बसला; भीतीनं घामाघूम प्रवाशांच्या ट्रेनमधून धडाधड उड्या, दादर स्टेशनवर थरार

पुणे जिल्ह्यातील तळेगाव ते चाकण क्रमांक ५४८ डी राष्ट्रीय महामार्गावरील ० ते २६ किलोमीटर दरम्यान ४ पदरी उन्नत आणि ४ पदरी जमिनीस समांतर महामार्गासह याच महामार्गावर चाकण ते शिक्रापूर दरम्यान पुढे २६ ते ४३ किलोमीटर लांबीमध्ये ४ पदरी जमिनीस समांतर महामार्गाची डीएफबीओटी (डिझाईन, फायनान्स, बिल्ट, ऑपरेट ॲन्ड ट्रान्सफर) पद्धतीने सुधारणा करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Mumbai Pune New Highway
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार? एकाचवेळी ३००० येणार? महत्त्वाची तारीख आली समोर

या महामार्गाची कामे पूर्ण झाल्यानंतर चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मदत होणार आहेत. त्यामुळे ही कामे दर्जेदार व विहित कालमर्यादेत पूर्ण करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित आदी उपस्थित होते.

Mumbai Pune New Highway
Election : पुण्यात निवडणुकीचं बिगुल वाजलं, २६ ग्रामपंचायतीत धुरळा उडाला, वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com