Election : पुण्यात निवडणुकीचं बिगुल वाजलं, २६ ग्रामपंचायतीत धुरळा उडाला, वाचा सविस्तर

Pune Bhor Gram Panchayat elections : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात २६ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर. २८ एप्रिलला मतदान तर २९ एप्रिलला निकाल लागणार. संपूर्ण वेळापत्रक आणि महत्त्वाची माहिती वाचा.
Election 2026: धुरळा उडाला
Election 2026: धुरळा उडाला Saam Tv
Published On

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Pune Gram Panchayat Election : पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुरळा उडाला. जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर पुणे जिल्ह्यात आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं बिगुल वाजले आहे. भोर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामधील ९ थेट सरपंच आणि ३४ सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. याचं सविस्तर वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. (Pune gram panchayat by-election 2026 full schedule)

पुण्याच्या भोरमध्ये ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा बिगुल वाचले आहे. भोर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमधील रिक्त असलेल्या ९ थेट सरपंच आणि ३४ सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी २८ एप्रिलला मतदान होणार आहे, तर २९ एप्रिलला निकाल जाहीर केला जाणार आहे. निधन,राजीनामा आणि इतर कारणांमुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. त्याच्या निवडणुका जाहीर करण्यात आली आहे.

Election 2026: धुरळा उडाला
Kharat Case: अशोक खरातनं ५ जणांचा नरबळी दिला? धक्कादायक दावा, वाचा कोर्टात नेमकं काय काय झालं

निवडणूक कार्यक्रमानुसार, ३० मार्चला तहसीलदारांकडून नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर ७ ते १३ एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येतील.१५ एप्रिलला अर्जाची छाननी होईल, तर १७ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे..२८ एप्रिलला प्रत्यक्ष मतदान आणि २९ एप्रिलला मतमोजणी होईल, असे सांगण्यात आले आहे.

Election 2026: धुरळा उडाला
Kharat Case : भोंदू खरातच्या संपर्कात बड्या महिला नेत्या; निवडणुकीत विजयासाठी 'अघोरी' विद्येचा आधार? लवकरच होणार चौकशी

भोर तालुक्यात निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेक ठिकाणी आपल्या जागांसाठी जुळवाजुळव केली जात आहे. विविध इच्छुकांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात..रिक्त जागेवर प्रबळ, सर्वसमावेशक उमेदवार देण्यासाठी गावागावात रणनीती आखली जात आहे. भोर तालुक्यात सध्या निवडणुकीचे वार वाहत आहे. ९ सरपंच कोणत्या पार्टीचे होणार, याकडे भोर तालुक्याचे लक्ष लागलेय.

Election 2026: धुरळा उडाला
Pune : कारवाई कमी अन् कर्मचाऱ्याची "हवा"च जास्त, पुणे महापालिकेच्या रिलस्टारची जोरदार चर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com