Kharat Case : भोंदू खरातच्या संपर्कात बड्या महिला नेत्या; निवडणुकीत विजयासाठी 'अघोरी' विद्येचा आधार? लवकरच होणार चौकशी

Ashok Kharat Case updates : अशोक खरात प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी एका महिला नेत्यानं खरातकडे पूजा केल्याचा आरोप असून SIT तपासात CCTV फुटेजमधून अनेक नावे समोर येण्याची शक्यता आहे.
Nashik Captain Ashok Kharat :
Multiple FIRs filed against Ashok Kharat as investigation into exploitation case intensifies.saam tv
Published On

woman politician visited Ashok Kharat for election ritual : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचे दररोज नवीन पराक्रम समोर येत आहेत. राजकीय नेत्यांपासून ते सर्वसामान्य आणि व्यावसायिक नेत्यांनीही भोंदू बाबाकडे अघोरी पूजा केल्याचं समोर येत आहे. मागली ४ दिवसांपासून एसआयटीकडून खरातची चौकशी केली जात आहे. त्याशिवाय खरातकडे गेलेले तसेच पीडित महिलांचा जबाब पोलिसांकडून नोंदवण्यात येत आहे. आतापर्यंत खरातवर ६ पेक्षा जास्त गुन्हे नोंदवण्यात आले आहे. खरातही कोट्यवधींची माया आणि शेकडो एकर जमिनीचा कारभारही समोर आला आहे. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिला नेत्यानं खरातकडे पूजा केल्याचं समजतेय. लोकसभा निवडणुकीत जिंकण्यासाठी महिला नेत्यानं खरातकडे पूजा केल्याची माहिती सूत्रांनी सांगितलं.

उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकींशी संबंधित धक्कादायक माहिती एसआयटीच्या तपासात समोर आली आहे. एक महिला नेत्या भोंदू अशोक खरातकडे ‘तोटका’ करण्यासाठी गेल्याची माहिती एसआयटीला मिळाली आहे. एसआयटीकडून त्या महिला नेत्याचाही चौकशी केली जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. एसआयटीला खरातच्या कार्यालयातील अनेक सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. त्यामध्ये अनेक धक्कादायक नावं समोर आली आहेत, त्या सर्वांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

Nashik Captain Ashok Kharat :
Gold Rate Today : एकाच दिवसात सोनं १० हजारांनी स्वस्त, प्रति तोळा इतक्या रूपयांवर आले, वाचा

लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी उत्तर भारतामधील एक महिला नेत्या अशोक खरात याच्याकडे गेली होती. ती महिला नेता तोटका करण्यासाठी खरातकडे गेल्याचं समोर आले आहे. अशोक खरात यानं त्या महिला नेत्याला “धक्कादायक निकाल लावून देतो” म्हणत पूजा करण्यास भाग पाडल्याचा दावा करण्यात येत आहे. ती महिला नेत्या नेमकी कोण आहे? याची चर्चा नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात सुरू झालेली आहे.

Nashik Captain Ashok Kharat :
Kharat Case : त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही...भोंदू अशोक खरातवरून विधानसभेत खडाजंगी, कोण काय म्हणालं? VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याने यापूर्वीही अनेक निवडणुकीच्या आधी अशाच पूजा केली होती. SIT कडून संबंधित महिला नेत्याची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणुकीत यशासाठी अनेक नेते खरातकडे गेल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. खरातच्या कार्यालयात संबंधित नेत्या आणि कुटुंब वारंवार येत असल्याची माहिती समोर आले आहे. खरात याच्या कार्यालयातील CCTV फुटेज SIT च्या हाती लागले आहे. त्या सर्वांना चौकशीसाठी बोलवण्यात येऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

Nashik Captain Ashok Kharat :
Maharashtra politics : १५ महिन्यात राष्ट्रवादीच्या ३ दिग्गजांचे राजीनामे, २ मंत्र्यांचा समावेश, नेमकी कारणं काय?

खरात प्रकऱणात विधीज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती

नाशिक भोंदूबाबा अशोक खरात महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात ज्येष्ठ विधीज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारकडून ज्येष्ठ विधीज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजय मिसर यांनी २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट, २०११ मधील दादर ऑपेरा हाऊस बॉम्बस्फोट, रवी पुजारी खटला, नाशिक धान्य घोटाळा यासह अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Nashik Captain Ashok Kharat :
Kharat Case : भोंदू अशोक खरातच्या फार्महाऊसवर कोणते राजकीय नेते, VIP जायचे? SIT चौकशीत सगळ्यांची नावं उघड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com