Gold Rate Today : एकाच दिवसात सोनं १० हजारांनी स्वस्त, प्रति तोळा इतक्या रूपयांवर आले, वाचा

Gold Silver rate drop today : सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून एकाच दिवसात तब्बल १० हजार रुपयांनी भाव कमी झाले आहेत. सध्या सोनं १.३८ लाख प्रति तोळ्यावर आले आहे. चांदीच्या दरातही मोठी घट झाली असून ग्राहकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे.

Latest gold and silver rates : गेल्या काही काळापासून सतत वाढत असलेल्या सोन्या-चांदीच्या दरांनी आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. या घसरणीमुळे सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली.

सोन्याच्या दरात एकाच दिवसात प्रति तोळा तब्बल १० हजार रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर सोन्याचे दर आता १ लाख ३८ हजार रुपयांवर आले आहेत. सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी घट पाहायला मिळाली आहे. चांदीचे दर तब्बल २२ हजार रुपयांनी घसरले असून, आता चांदी २ लाख १४ हजार रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे.

लग्नसराईचा काळ आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव कमी झाल्याने सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे अनेकांनी आपली खरेदी पुढे ढकलली होती. मात्र, आता ही मोठी घसरण झाल्यामुळे सराफा दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जागतिक बाजारपेठेतील घडामोडींचा परिणाम म्हणून ही दरवाढ कमी झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com