Kharat Case : भोंदू अशोक खरातच्या फार्महाऊसवर कोणते राजकीय नेते, VIP जायचे? SIT चौकशीत सगळ्यांची नावं उघड

Ashok Kharat Case updates : अशोक खरात प्रकरणात एसआयटी तपास वेगात सुरू असून फार्महाऊसवर कोणते राजकीय नेते आणि व्हीआयपी येत होते याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
Ashok Kharat,
Ashok Kharat,Saam Tv
Published On

अभिजित सोनवणे, नाशिक प्रतिनिधी

Ashok Kharat farmhouse probe : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्याबाबत दररोज नवीन माहिती समोर येत आहे. खरात प्रकरणाचा तपास वेगाने कऱण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी दिल्या आहेत. एसआयटी, गुन्हा शाखांसोबत इतर संस्थांकडूनही खरातची कसून चौकशी केली जात आहे. खरात याला राजकीय अभय असल्याचा आरोप वारंवार होत आहे. आता एसटीआयटीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरात याच्याकडे कोणकोणत्या नेत्यांची उठबस होती. खरातच्या फार्महाऊसवर कोण कोण आले होते, याची सर्व माहिती एसआयटीला मिळाली आहे. एसटीआटीच्या तपासात काय समोर आले? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SIT कडून वेगात तपास केला जात आहे. या प्रकऱणात असलेल्या एकालाही सोडणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले होते. त्यानंतर एसटीआयटीकडून खरातच्या जवळच्या आणि विश्वासू सर्व लोकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. खरात याच्या फार्महाऊस मॅनेजर, शिपाई आणि मंदिर पुजाऱ्याची रविवारी तब्बल ८ तास चौकशी केली. या चौकशीतून एसआयटीला अतिशय महत्त्वाची माहिती मिळाल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात आता कुणाची नावे समोर येणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Ashok Kharat,
१०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा कॅप्टन खरातच्या आणखी 'करामती'; एकापेक्षा एक कारनामे उघड

भोंदू बाबा अशोक खरात फार्महाऊस आणि मंदिरात कधी यायचा? याची टाइमलाईनच एसआयटीकडे आलेली आहे. त्याशिवाय खरातच्या फार्महाऊसवर कोणते राजकीय नेते आणि प्रभावी व्यक्ती येत होते, याची माहितीही SIT ला शिपाई, फार्महाऊस मॅनेजर आणि मंदिराच्या पुजाऱ्याने दिली आहे. खरातला नेमकं कोण कोणते नेते भेटायला येत होते? त्यांचा या प्रकरणात समावेश होता का? याची चर्चा नाशिक आणि परिसरात सुरू झाली आहे.

Ashok Kharat,
कॅप्टन खरातमुळे राजकीय नेता अडचणीत? कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच

कामगार आणि पुजाऱ्याचा खरातसोबत संपर्क कसा आला? यावरही एसआयटीने चौकशी केली. मंदिर स्थापनेपासून असलेल्या पुजाऱ्याने अनेक नावांचा खुलासा केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. पूजाविधीसाठी येणाऱ्या व्यक्तींची यादी SIT च्या हाती लागल्याने या प्रकरणाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. लैंगिक शोषण प्रकरणात तपासाचा फोकस वाढला असून खरातच्या नेटवर्कचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एसटीआयटीच्या तपासात कुणाचा पर्दाफाश होणार? याची चर्चा सुरू झाली आहे.

Ashok Kharat,
Ashok Kharat Case: लॅपटॉप,हार्ड डिस्क आणि...; भोंदूबाबा अशोक खरातच्या घरात पोलिसांना काय-काय सापडलं?

सलग पाचव्या दिवशी SIT कडून गोपनीय ठिकाणी खरातची चौकशी करण्यात आली. विविध गुन्ह्यांच्या अनुषंगाने सखोल तपास सुरू आहे. आर्थिक व्यवहार, नेटवर्क आणि लैंगिक शोषण प्रकरणावर एसटीआयटीकडून तपास केला जात आहे. आज खरातला मिरगावमध्ये नेण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. ईशान्येश्वर मंदिर आणि फार्महाऊसवर खरात याची चौकशी होणार आहे. घटनास्थळी नेऊन पुराव्यांची पडताळणी करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Ashok Kharat,
Ashok Kharat: नकली साप अन् वाघाची भीती, भोंदू खरातच्या अघोरी कृत्याचा आणखी एक धक्कादायक खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com