Ashok Kharat: नकली साप अन् वाघाची भीती, भोंदू खरातच्या अघोरी कृत्याचा आणखी एक धक्कादायक खुलासा

Nashik Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहित समोर आली आहे. नकली साप अन् वाघाची भीती दाखवून नागरिकांना लाखो रुपयांना लुबाडले.
Ashok Kharat: नकली साप अन् वाघाची भीती, भोंदू खरातच्या अघोरी कृत्याचा आणखी एक धक्कादायक खुलासा
Ashok Kharat Case saam tv
Published On

Summary -

  • अशोक खरातच्या अघोरी कृत्यांचा मोठा खुलासा

  • नकली साप-वाघ वापरून भाविकांना घाबरवून फसवणूक

  • बनावट रत्ने विकून लाखो रुपयांची लूट

  • एसआयटी आणि पोलिसांकडून तपासाला वेग

अभिजित सोनवणे, नाशिक

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातच्या अघोरी कृत्यांचा आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. खरात नकली साप आणि वाघ ठेवून भीतीचं वातावरण निर्माण करायचा. रिमोट कंट्रोलने सापाच्या आणि वाघाच्या हालचालींनी चमत्कार दाखवत लोकांची फसवणूक करत होता. संमोहन आणि अघोरी विधींच्या नावाखाली त्याने भाविकांकडून पैसे उकळण्याचा पॅटर्न तयार केला होता. बाजारात स्वस्त मिळणारे रानटी चिंचोके पॉलिश करून महागडे खडे म्हणून विक्री त्याचे तो विक्री करायचा.

भोंदूबाबा अशोक खरात १०० रुपयांच्या वस्तूला भाविकांच्या आर्थिक परिस्थितीनुसार १० हजार ते १ लाखांपर्यंत विक्री करत गंडवायचा. नकली खडे आणि रत्ने दैवी असल्याचा दावा करत त्याची तो विक्री करायचा. भाबड्या भाविकांना लक्ष्य करत आतापर्यंत त्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली आहे. यासंदर्भात खरातविरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत यातूनच अंधश्रद्धेच्या आड त्याने चाललेल्या मोठं रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

Ashok Kharat: नकली साप अन् वाघाची भीती, भोंदू खरातच्या अघोरी कृत्याचा आणखी एक धक्कादायक खुलासा
Ashok Kharat: भोंदुबाबा खरातचा आणखी एक भयंकर कारनामा, गर्भवती महिलेवरही अत्याचार; नवऱ्याला बाहेर बसवून...

अशोक खरात याच्याविरोधात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या एसआयटी आणि नाशिक पोलिस करत आहे. अशोक खरात प्रकरणात आता एसआयटीकडून तपासाला वेग आला आहे. ईशान्येश्वर मंदिराच्या पुजाऱ्यासह बंगल्यातील कामगारांची चौकशी एसआयटीमार्फत केली जात आहे. एसआयटी आणि नाशिक पोलिसांकडून या प्रकरणाचा संयुक्त तपास सुरू आहे. मंदिराचा पुजारी, वॉचमन आणि देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तब्बल ८ तास चौकशी करण्यात आली.

Ashok Kharat: नकली साप अन् वाघाची भीती, भोंदू खरातच्या अघोरी कृत्याचा आणखी एक धक्कादायक खुलासा
Ashok Kharat: विरोधी पक्षातील नेतेही अशोक खरातकडे जायचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा खुलासा

एसआयटीने चौकशीनंतर तिघांना सोडून दिलं. पण या प्रकरणाच्या तपास अधिक गतीमान झाल्याची माहिती आहे. यावेळी मंदिर आणि बंगल्यातील हालचालींबाबत पोलिस आणि एसआयटीने सविस्तर माहिती घेतली. भोंदूबाबा खरातच्या मंदिर आणि बंगल्यावर येणाऱ्या व्हीआयपी भक्त आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांची माहिती तपासाच्या केंद्रस्थानी असणार आहे. जमीन खरेदी-विक्री व्यवहारात सहभागी असलेले लोकही एसआयटीच्या रडारवर आहेत. मंदिर आणि बंगला गावापासून दूर असल्याने हालचाली गुप्त राहत होत्या. धार्मिक कार्यक्रमावेळीच या ठिकाणी राबता वाढायचा इतर वेळी परिसर शांत राहायचा अशी माहिती तपासातून समोर आली आहे.

Ashok Kharat: नकली साप अन् वाघाची भीती, भोंदू खरातच्या अघोरी कृत्याचा आणखी एक धक्कादायक खुलासा
Ashok Kharat: अजितदादांच्या घर अन् कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली; अमोल मिटकरींचा दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com