Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची SIT चौकशी
Deepak Kesarkarsaam tv

Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची SIT चौकशी

political links in fake baba scandal: नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या निकटवर्तीयाची एसआयटीकडून चौकशी सुरू आहे.
Published on

Summary -

  • अशोक खरात प्रकरणात एसआयटी चौकशीला वेग

  • दीपक केसरकर यांच्या निकटवर्तीयाची चौकशी

  • रुपाली चाकणकर यांचा राजीनामा

  • प्रकरणामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं

नाशिकमधील स्वयंघोषित कॅप्टन आणि भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात आता माजी मंत्री दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची एसआयटी चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय दीपक लोंढे एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. एसआयटी टीमकडून दीपक लोंढेंची कसून चौकशी सुरू आहे. लोंढे सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात सक्रिय आहे. लोंढेकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिस अशोक खरातच्या राजकीय आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहचणार आहेत.

अशोक खरात प्रकरणात आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला. अशोक चव्हाय यांच्या प्रकरणावरून रुपाली चाकणकर यांच्यावर विरोधकांकडून अनेक गंभीर आरोप होत आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधक प्रचंड आक्रमक झाले होते. अखेर शुक्रवारी रुपाली चाकणकर यांनी मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत अशोक खरातवर कठोर कारवाईची मागणी केली.

Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची SIT चौकशी
Ashok Kharat Case: शंभरहुन अधिक महिलांचे लैंगिक शोषण; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी व्हिडिओ येणार समोर

रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्यावर टीका केली. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, 'राज्यातील सर्वाधिक अकार्यक्षम महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा तर दिला पण राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला नाही. स्वेछेने वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. म्हणजे खरात प्रकरणात त्यांनी महिलांवर, पत्रकारांवर टाकलेला दबाव या प्रकरणी पोलिस तक्रार होऊ नये म्हणून केलेले उद्योग याचा कुठलाही खेद, चूक झाली अस त्यांना वाटत नाही.

Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची SIT चौकशी
Ashok Kharat Video : रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याचे निर्देश; 'कॅप्टन फाइल्स' भोवली, सूत्रांची माहिती

तसंच,'राजीनामा देताना पण उपकार असल्यागत चाकणकर यांचे वागणे निषेधार्ह आहे. रूपाली चाकणकर हा छोटा मासा आहे यात अजून किती मंत्री होते कोणी या बलात्कारी बाबाला राजाश्रय दिला,वाचवण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. हे प्रकरण दाबण्यासाठी कोणत्या नेत्यांनी, मंत्र्यांनी फोन केले याचीही चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे.', अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची SIT चौकशी
Ashok Kharat Case: अनामिका बोट का कापलं? २ सप्टेंबरच्या फोटोचं सत्य काय? रुपाली चाकणकरांनी सगळंच सांगितलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com