

अशोक खरात प्रकरणात १०० हून अधिक महिलांच्या शोषणाचा आरोप
अनेक अश्लील व्हिडिओ समोर आल्याने खळबळ
नीरज जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतले
स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेनंतर राजकारणातील अनेक लोकांशी असलेलं त्याचं कनेक्शन उघड झालं. अनेक नेत्यांसोबतचे त्याचे फोटोही समोर आलेत. तर चांगलीच खळबळ उडाली आहे. अशोक खरात आपल्या ऑफिसमध्ये महिलांशी अश्लील चाळे करायचा.
खरात याने १०० हुन अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचं सांगितलं जात आहे. कॅप्टन खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधवला पोलिसांनी पकडलं आहे. त्यामुळे नवीन काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. नीरज जाधवने खरात महिलांसोबत अश्लील चाळे करत असल्याचे व्हिडीओ काढल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याकडे तब्बल १०० व्हिडीओ असल्याची माहिती समोर आली आहे.
खरातच्या या अशा काळ्या कारनामाचा पदार्फाश ऑफिस बॉय नीरज जाधवनेच केला. डिसेंबर २०२५ मध्ये नीरज याने अशोक खरात याच्या नकळत कार्यालयात महिलांवर झालेल्या बलात्काराचे व्हिडिओ बनवले होते. दरम्यान आता याप्रकरणाच तपास करणाऱ्या पोलिसांच्या विशेष पथकाने नीरज जाधव पकडलं आहे.
नीरज जाधवच्या विरोधात शिर्डीत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. पीडित मुलीला तिचे मॉर्फ व्हिडिओचे स्क्रीनशॉट्स पाठविल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. नीरज जाधवकडे १०० हुन अधिक महिलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडीओ असल्याची माहिती मिळत आहे.
महिलांवर अत्याचार करून, अशोक खरात हा समाजात ‘साधू’ म्हणून वावरत होता. ते पाहून नीरजच्या मनात पैशांची हाव निर्माण झाली. त्याने अत्याचाराचे ते व्हिडीओ ताब्यात घेतले. त्याच व्हिडिओच्या माध्यमातून त्याने खरात याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.एवढंच नव्हे तर नीरज आणि त्याच्या काही साथीदारांनी, या आक्षेपार्ह क्लिप्सच्या बदल्यात अशोक खरात याच्याकडे 5 कोटी रुपयांची खंडणीही मागितली होती. मात्र अशोक खरात याने त्याला काहीच दाद दिली नाही. त्याने नीरजच्या धमक्यांना भीक घातली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.