महिलांना स्वत:ची लघवी पाजायचा अन् काचेच्या कॅबिनमध्ये सर्वांसमोरच...; कॅप्टन खरातचा आणखी एक कारनामा उघड

Nashik Crime Astrologer Captain : नाशिकमधील एका स्वयंघोषित ज्योतिषाला लैंगिक शोषणाच्या धक्कादायक प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासात धक्कादायक आरोप समोर आले आहेत.
Nashik Crime Astrologer Captain
Nashik Crime Astrologer Captainsaam tv
Published On
Summary
  • नाशिकमध्ये भोंदू ज्योतिषीचा पर्दाफाश.

  • महिलांवरील अत्याचाराचे गंभीर आरोप.

  • क्राइम ब्रँचकडून तपास सुरू.

नाशिकमध्ये स्वतःला ज्योतिषी आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळखणाऱ्या अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आलीय. नाशिक क्राइम ब्रँचने बुधवारी पहाटे त्याला ताब्यात घेतले. दरम्यान कथित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरातच्या विकृत प्रकारांची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरातचा विकृतपणा वाचून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. कथित ज्योतिषी त्याच्या कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसमध्ये महिलांना बोलावून त्यांचं लैंगिक शोषण करायचा.

अशोक खरात नाशिकमधील कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसमध्ये महिलांना बोलवायचा. भविष्य सांगण्याच्या नावाखाली त्या भक्तांशी वेडेचाळे करत असायचा. काळ्या काचांच्या ऑफिसमध्ये तो महिलांशी अश्लील कृत्य करायचा. कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसमध्ये तो महिलांना ज्योतिष सांगण्याच्या बहाण्यानं बोलवत स्वतः लघुशंका करुन तो महिलांना लघवी प्यायला देत असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत:ला ज्योतिष म्हणणाऱ्या भोंदू बाबा खरातचा भांडाफोड झाला आहे. खरातची काळी कृत्य उघ़ड झाल्यानंतर आता आणखी काही तक्रारदार महिला समोर येण्याची शक्यता आहे.

खरातनं गुंगीचे औषध देऊन एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्या अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या भोंदूबाबाकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आपले भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते. त्यांचे व्हीडिओही पोलीस तपासात उघडकीस आलेत. सिन्नर तालुक्यात अशोक खरातने श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केली आहे.

या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकरदेखील आहेत. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनीही या मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. तेव्हापासून अशोक खरात जास्त चर्चेत आला होता. पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेन ड्राईव्ह मधून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com