Ashok Kharat: भोंदुबाबा खरातचा आणखी एक भयंकर कारनामा, गर्भवती महिलेवरही अत्याचार; नवऱ्याला बाहेर बसवून...

Nashik Ashok Kharat Case Update: नाशिकमधील भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भोंदुबाबाने गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याचे तपासातून समोर आले आहे.

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अशोक खरातने १०० पेक्षा अधिक महिलांवर लैंगिक अत्याचार केले असून त्यांच्याकडे असलेल्या पेन ड्राइव्हमध्ये पोलिसांना आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले. अशोक खरातविरोधात आता आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात खरातविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसा त्याचा तपास करत आहेत. खरातने गर्भवती महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

पीडित महिला गर्भवती असताना नराधम खरातने तिच्यावर लैंगिक शोषण केले. गरोदरपणात पूजा विधीच्या नावाखाली त्याने लैंगिक अत्याचार केले. यावेळी त्याने पीडितेच्या नवऱ्याला बाहेर बसवून तिच्यासोबत हे भयंकर कृत्य केले. ऐवढ्यावर न थांबता त्याने पीडिता आणि तिच्या कुंटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. नराधम अशोक खरात नकली साप आणि नकली वाघाचे कातडी आणून लोकांना घाबरवून अघोरी कृत्य करत असल्याचा उल्लेख महिलेने तक्रारीत केला आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com