

पोलिसांनी लॅपटॉप, हार्ड डिस्कसह डिजिटल पुरावे जप्त केले
SIT कडून तपास वेगात सुरू
मोबाईल CDR आणि CCTV फुटेज तपासणी सुरू
अंकशास्त्रज्ञ आणि 'कॅप्टन' म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी संपूर्ण नाशिकसह महाराष्ट्र हादरला आहे. राजकीय नेत्यांच्या गराड्यात राहणारे ज्योतिष खरातचे अनेक कारनामे समोर येत आहेत. त्याने दोनशेहुन अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती, एका पत्रकाराने दिली आहे.
खरात प्रकरणाचा तपास SIT कडून करण्यात येत आहे. कॅप्टन खरातने अनेक महिलांचे शोषण केल्याची माहिती असून त्याबाबत सर्व माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. सध्या तीन महिला तक्रार देण्यासाठी पुढे आल्या असल्याची माहिती आणखी काही महिला पुढे येण्याच्या शक्यता आहे.
नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये कॅप्टन खरातसह त्याच्या संपर्कातील अन्य लोकांच्या विरोधातील लैंगिक अत्याचार, खंडणी आणि ब्लॅकमेलिंगच्या तक्रारींची माहिती घेण्याचं काम सुरू आहे. कॅप्टन खरातचे कार्यालय, निवासस्थानावरील लॅपटॉप, कम्प्युटर, हार्ड डिस्क आणि सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरू आहेत. कॅप्टन अशोक खरात यांच्या मोबाईलमधील सर्व संभाषणाचे सीडीआर काढण्याचे काम देखील सुरू आहे.
अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झालेला अधिकारी असल्याचं सांगतो. निवृत्तीनंतर त्याने ज्योतिष आणि अंकशास्त्राच्या नावाने नाशिकमध्ये आपले जाळं विणलं. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात त्याचं 'ओकस प्रॉपर्टी डीलर अँड डेव्हलपर्स' नावाचे कार्यालय आहे. या कार्यालयात येणाऱ्या महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री एका फिल्मी स्टाईल सापळ्यात खरातला अटक करण्यात आली.
दरम्यान अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात होती. विरोधक आणि पक्षातील नेत्यांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले होते.
खरात याने २०० पेक्षा जास्त महिलांचे लैंगिक शोषण केले असावे, असा संशय व्यक्त केला आहे. खरातकडे येणाऱ्या बहुतांशी महिला या उच्चशिक्षित आणि राजकारणी घराण्यातील असायच्या. कॅप्टन खरात महिलांना संमोहित करायचा, त्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करायचा. अशोक खरात महिलांना 'मी देव आहे. तुझं आयुष्य चांगलं करायचं असेल तर मला तुझं योनी शुद्धीकरण करावं लागेल, असं सांगात त्याने महिलांचे लैंगिंक शोषण केल्याचा धक्कादायक खुलासा खबरदार पुढारी वृत्तपत्राचे संपादकांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.