चांगल्या आयुष्यासाठी असेल तर मला तुझं...; उच्चशिक्षित महिलांच्या रांगा, योनी शुद्धीकरण, खरातचा धक्कादायक कारनामा उघड

Nashik Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात झालेल्या नवीन खुलाशांमुळे शोषण आणि हेराफेरीचे गंभीर आरोप झाले आहेत. तपास अधिकारी या धक्कादायक दाव्यांची अधिक सखोल चौकशी करत आहेत.
Nashik Ashok Kharat Case :
Ashok Kharat case sparks outrage as new allegations and disturbing claims emerge during investigation.saam tv
Published On
Summary
  • अशोक खरात प्रकरणात नवीन धक्कादायक आरोप

  • २०० हून अधिक महिलांच्या शोषणाचा संशय

  • उच्चशिक्षित महिलाही पीडित असल्याचा दावा

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवी नवीन खुलासे होत आहेत. आता खबरदार पुढारी' दैनिकाचे संपादक दत्तात्रय खेमनार एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितनुसार आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. खरात याने २०० पेक्षा जास्त महिलांचे लैंगिक शोषण केले असावे, असा संशय व्यक्त केला आहे. खरातकडे येणाऱ्या बहुतांशी महिला या उच्चशिक्षित आणि राजकारणी घराण्यातील असल्याचा दावाही खेमनार केला आहे.

Nashik Ashok Kharat Case :
राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद कोणाला मिळणार? दोन नावांची चर्चा, कोण आहेत 'त्या' महिला नेत्या?

कॅप्टन खरात महिलांना संमोहित करायचा, त्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करायचा, असं सांगत दत्तात्रय खेमनार यांनी या प्रकरणातील एक धक्कादायक उलगडा केला आहे. अशोक खरात महिलांना 'मी देव आहे. तुझं आयुष्य चांगलं करायचं असेल तर मला तुझं योनी शुद्धीकरण करावं लागेल, अशं सांगायचा. तो महिलांना स्वत:चं मुत्र प्यायला लावायचा', असा खळबळजनक दावाही दत्तात्रय खेमनार यांनी केला.

Nashik Ashok Kharat Case :
रुपाली चाकणकरांना अशोक खरात प्रकरण भोवलं; महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपदही जाणार

अशोक खरातचे कारनामे सांगताना खेमनार यांनी एका व्यापाऱ्यासोबत घडलेल्या प्रकाराची धक्कादायक माहिती दिली. खरातने त्या व्यापाऱ्याला खोटी रत्नं देऊन फसवलं होतं. खरात हा त्याच्याकडे येणाऱ्या स्त्री-पुरुषांनाही एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवायला सांगायचा. खरातने एका बड्या उद्योजकाचे दुसऱ्या एका महिलेशी संबंध जुळवून दिले होते.

त्यानंतर ती महिला गर्भवती असल्याचे खोटे सांगून त्या उद्योजकाला ब्लॅकमेल करत खरातने त्याच्याकडून 20 कोटी रुपये उकळल्याची माहितीही खेमनार यांनी सांगितले. इतकेच नाहीतर खरात याने एका माजी मंत्र्याला शक्तीवर्धक गोळ्यांचं पाणी देत असायचा. पाणी म्हणजे ओशनो जल आहे. हे पाणी प्यायल्यास तू एनर्जिटीक राहशील, तब्येत चांगली राहील. असे सांगून त्याने या मंत्र्याला गंडा घातल्याची माहितीही खेमनार यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com