कॅप्टन खरातमुळे राजकीय नेता अडचणीत? कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच

ashok kharat news : जेफ्री एपस्टीन सारखंच महिलांचं शोषणावर आधारित असलेल्या कॅप्टन खरातच्या साम्राज्याला सुरुंग लागलाय.. मात्र कॅप्टन खरातची संपत्ती जप्त करण्यात आल्यानं बड्या राजकीय नेत्याचं टेन्शन वाढलंय.. मात्र हा नेता कोण? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
ashok kharat
ashok kharat news Saam tv
Published On

कथित ज्योतिषशास्त्राच्या आडून महिलांचं लैंगिक शोषण करणारा भोंदू कॅप्टन अशोक खरात... पोलिसांनी याच खरातच्या मुसक्या आवळल्या... आणि तपासाची चक्रं फिरायला सुरुवात झाली..पोलिसांनी खरातच्या मिरगावच्या फार्म हाऊसवर छापेमारी केली... याच छापेमारीत खरातकडे तब्बल 200 कोटींची संपत्ती असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय... मात्र खरातची संपत्ती फक्त एका शहरापुरती मर्यादित नाही तर त्याच्या संपत्तीचं जाळं राज्यभरच नव्हे तर परदेशातही असल्याची चर्चा रंगलीय..

नाशिकच्या पाथर्डी परिसरात 150 कोटी किंमतीची 30 एकर जमीन आहे.. एवढंच नाही तर सिन्नर तालुक्यातील कहाळवाडी आणि मिरगावमध्ये खरातची कोट्यवधीची संपत्ती आहे... पाथर्डी आणि गौळाणे गावात मुलीच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती आहे.. ओझर विमानतळाजवळ जानोरीत खरातची 5 कोटींची जमीन आहे. शिर्डीतही मोक्याच्या जागेवर कोट्यवधींची संपत्ती आहे. नाशिकच्या कर्मयोगीनगर आणि कॅनडा कॉर्नर परिसरात अलिशान ऑफिस आहे. तर गुन्हे शाखेने मारलेल्या छाप्यात खरातच्या घरातून 6 लाखांची रोकड आणि, 1 पिस्तूल, 3 वापरलेली आणि 16-17 जीवंत काडतूसं जप्त केलेत..

ashok kharat
तुझा नवरा मरेल, माझी गर्लफ्रेंड हो; विवाहितेवर २ वर्षे अत्याचार, अशोक खरातचा धक्कादायक कारनामा उघड

आता खरात पुरता अडकला... आणि त्यामुळेच राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहेत... एका मोठ्या राजकीय नेत्याची बेनामी संपत्तीच खरातच्या नावावर असल्याची चर्चा रंगलीय.. मात्र हा बडा नेता कोण? यावर चर्चा सुरू असतानाच वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे खरातसोबतचे फोटो समोर आलेत...

कॅप्टन खरातसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार दीपक केसरकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे फोटो समोर आलेत... एवढंच नाही तर रुपाली चाकणकर या खरातची पाद्यपुजा करत असल्याचा व्हिडीओही समोर आलाय...

याच खरातने महिलांचं लैंगिक शोषण करतानाचे 58 व्हिडीओ पोलिसांनी जप्त केलेत.. एवढंच नाही तर आता खरातच्या काळ्या कारनाम्यांची माहिती समोर आल्यानंतर ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.. खरातची नीट चौकशी झाली तर सरकार पडण्याचा दावाच राऊतांनी केलाय..

ashok kharat
कॅप्टन खरात महिलांचं शोषण करणारा भोंदूबाबा; महिला अत्याचाराचे 58 व्हिडीओ समोर?

दुसरीकडे खरातच्या काळ्या कारनाम्यांचा बुरखा फाडण्यासाठी सरकारने दबंग आयपीएस अधिकारी तेजस्वीनी सातपुतेंची नियुक्ती केलीय...... त्यामुळे जेफ्री एपस्टीन प्रमाणे महाराष्ट्रातही महिलांचं शोषण करुन राजकीय नेत्यांमध्ये उठबस करणाऱ्या कॅप्टन खरातच्या विकृतीची पाळमुळं उखडून टाकण्याची गरज आहे... त्यामुळे या तपासात खरातसोबतच बडा नेताही अडकणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com