कॅप्टन खरात महिलांचं शोषण करणारा भोंदूबाबा; महिला अत्याचाराचे 58 व्हिडीओ समोर?

ashok kharat news : अमेरिकेतल्या जेफ्री एपस्टीन फाईलने जगात खळबळ उडाली असताना महाराष्ट्रातही नवा एपस्टीन असल्याचा दावा करण्यात आलाय... मात्र हा नवा एपस्टीन कोण? आणि त्यावरुन कसं राजकारण तापलंय...पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....
ashok kharat news update
ashok kharat news Saam tv
Published On

ऐकलंत.... राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नाना पटोलेंनी भर सभागृहात हनी ट्रॅप प्रकरणावरुन रणकंदन केलं होतं... त्यामुळे नाशिकच्या हनी ट्रॅपचा मास्टरमाईंड कोण? याची उत्सुकता अजुनही कायम असतानाच नाशिकच्या सिन्नरमधील ईशानेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष कॅप्टन खरातवर 35वर्षीय महिलेनं जादूटोणा करत गुंगीचं औषध देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला.. त्यानंतर पोलिसांनी कॅप्टन खरातच्या मुसक्या आवळल्या... आणि तपासात कॅप्टन खरात म्हणून मिरवणारा भोंदूबाबा अशोक खरातचं बिंग फुटलं...केवळ एक दोन नव्हे तर तब्बल ५८ व्हीडीओ समोर आलेत... आणि हाच नाशिकचा एपस्टीन आहे का? असा जळजळीत सवाल ठाकरेसेनेच्या सुषमा अंधारेंनी उपस्थित केलाय...

खरंतर कॅप्टन खरात हा मर्चंट नेव्हीचा निवृत्त अधिकारी आहे... आणि सध्या ज्योतिषी म्हणून वावर... त्याने 22 वर्षे मर्चंट नेव्हीत काम करताना 154 देशांचे दौरे केले.. अंकशास्त्र तज्ज्ञ अशी खरातची ओळख आहे... 2022 मध्ये मिरगावच्या मंदिराला तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट दिल्यानं खरात चर्चेत आला होता. खरातकडे राजकीय नेते, उद्योगपती आणि अभिनेत्यांचा राबता असायचा... आता याच खरातवर महिलांवर लैंगिक शोषण प्रकरणी अटक केलीय..

ashok kharat news update
महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपलं; शेतकरी हवालदिल, पुढील ४८ तासांत २४ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

हा खरात अध्यक्ष असलेल्या इशान्येश्वर महादेव मंदिराच्या ट्रस्टवर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचंही नाव असल्याचा दावा अंधारेंनी केलाय.. एवढंच नाही तर चाकणकर या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी कॅप्टन खरातची पाद्यपुजा करत असल्याचा व्हिडीओही समोर आलाय..

आता याच व्हिडीओवरुन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी रुपाली चाकणकरांवर निशाणा साधलाय...तर अंधारेंनी थेट रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचीच मागणी केलीय..

अखेर खरात प्रकरणावरुन चाकणकरच निशाण्यावर आल्यानं चाकणकरांनी स्पष्टीकरण दिलंय..

शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट

काहीवेळा तिथं सामाजिक कार्यक्रम होतात

या कार्यक्रमांच्या निमित्ताने समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती जोडले गेले

कॅप्टन खरात यांचं वैयक्तिक आयुष्य आणि आरोपांबाबत मला कल्पना नाही

जे आरोप होताहेत त्यांची पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील

माझा पोलीस तपासावर पूर्ण विश्वास

ashok kharat news update
मोठी बातमी! भाजपच्या माजी मंत्र्याला अटक; पुणे पोलिसांच्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात आता कॅप्टन खरात प्रकरण समोर आलंय... त्यामुळे या प्रकरणी विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे... मात्र सरकारने भोंदुगिरीच्या माध्यमातून महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या नव्या एपस्टीनची मुळं महाराष्ट्राच्या पवित्र मातीत रुजण्याआधीच उखडून फेकण्याची गरज आहे... एवढंच नाही तर या कॅप्टन खरातला पाठिशी घालणाऱे ही समोर यायला हवेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाईही व्हायला हवी...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com