

पुणे ग्रामीण पोलिसांकडून भाजपच्या माजी मंत्र्याला अटक
गुंतवणूक फसवणूक आणि बँक अपहाराचे माजी मंत्र्यांवर गंभीर आरोप
माजी मंत्र्याला अटक केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रिसॉर्ट व्यवस्थापनाच्या व्यवसायातून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणे आणि यशवंत सहकारी बँकेतून कोट्यवधी रुपयांचं अपहार केल्याप्रकरणी भाजपच्या माजी मंत्र्याला अटक करण्यात आली आहे. शेखर चरेगावकर असे पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या भाजप नेत्याचे नाव आहे.
'सकाळ'च्या वृत्तानुसार, संबंधित गुन्ह्यात चिखली नागरी सहकारी बँकेचा अध्यक्ष सतीश भगवानदार गुप्ता, संतोष पवार, वनिता पवार, श्रीपदा कुलकर्णी, रोहित लभडे, सुरेंद्र काळे, सुमित घोडके यांच्याविरोधातही भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रदीप रामचंद्र चोरघे यांनी कोर्टात तक्रार दाखल केली होती. कोर्टाच्या आदेशानंतर आरोपींविरोधात ५ मार्च २०२४ रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता.
गुंतवणूक योजनेअंतर्गत आठ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करत त्यापैकी साडेसहा कोटींचा अपहार केल्याचं तक्रारीत नमूद आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चरेगावकरला अटक केली. या प्रकरणात तक्रारदारांच्या वतीने अॅड विपुल दुशिंग आणि अॅड.स्वानंद गोविंदवार यांनी बाजू मांडली. त्यानंतर कोर्टाने चरेगावकरला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
कराड पोलिसांनीही केली होती अटक
शेखर चरेगावकर याला मागील वर्षी देखील कराड पोलिसांनी केली होती. त्याच्यावर यशवंत बँकेत ११२ कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्याच्याविरोधात अंमलबजावणी संचानालयानेही गुन्हा दाखल केला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यानुसार दाखल कलम काढले आहे. त्यामुळे या प्रकरणात योग्य तपास व्हावा, असा अर्ज तक्रारदारांच्या वकिलांनी कोर्टात केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.