क्षणात होत्याचं नव्हतं झालं! घिरट्या घालत हॅलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं; दुर्घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Nepal helicopter crash : घिरट्या घालत हॅलिकॉप्टर जमिनीवर कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nepal helicopter accident
Nepal helicopter crashsaam tv
Published On
Summary

नेपाळच्या खेतांगमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घडली घटना

लँडिंगदरम्यान पायलटने नियंत्रण गमावल्याने घडला अपघात

हेलिकॉप्टरमध्ये असलेले सर्वजण सुरक्षित

नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. नेपाळच्या खेतांगमध्ये लँडिंगदरम्यान ही दुर्घटना घडली. पार्थिव आणणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेपाळमधील जिल्ह्याचे मुख्य जिल्हाधिकारी रेखा कंडेल यांनी सांगितलं की, 'हेलिकॉप्टरने शेतात लँडिग करताना नियंत्रण गमावलं. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर हे काठमांडू येथून पार्थिव घेऊन खोटांग येथे जात होते. त्यादरम्यान ही दुर्घटना घडली'. या अपघाताविषयी सविस्तर माहिती हाती आलेली नाही.

नेपाळच्या डोंगराळ भागात हेलिकॉप्टर आणि विमानांची येजा असते. पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी इतर भागात नेले जाते. वातावरणात बिघाड झाल्यानंतर विमान, हेलिकॉप्टरच्या दुर्घटना घडत असतात.

Nepal helicopter accident
Iran-US War: डोनाल्ड ट्रम्प खामेनेईंच्या मृत्यूनंतरही इराणमधील राजवट का बदलू शकले नाहीत? अमेरिकेची रणनीती का ठरली अपयशी?

हेलिकॉप्टर शेतात लँडिंग करण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी पायलटने हेलिकॉप्टरवरील नियंत्रण गमावलं. या हेलिकॉप्टरमधील सर्व लोक सुरक्षित आहेत. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरचे प्रचंड नुकसान झालं आहे. वातावरणात बिघाड झाल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या भागात बहुतांश विमानाच्या तुलनेत हेलिकॉप्टरच्या अधिक दुर्घटना घडतात. स्थानिक प्रशासनाने अपघाताचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास करण्याचं काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आलं आहे.

Nepal helicopter accident
Iran - US War: युद्धाच्या आगीत डोनाल्ड ट्रम्प स्वतःच होरपळले; अमेरिकी प्रशासनात भडका, नेमकं काय घडलं?

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

हेलिकॉप्टरच्या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड झाल्याचे दिसत आहे. त्यानंतर हेलिकॉप्टरच्या पायलटने तातडीने लँडिग करण्यास सुरुवात केली. परंतु पायलटचा लँडिग करताना हेलिकॉप्टरच तोल गेला. त्यानंतर हे हेलिकॉप्टर वेगाने शेतात कोसळलं. या दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातानंतरही हेलिकॉप्टरमधील पायलट आणि प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com