Ashok kharat Court Case updates News : भोंदू बाबा अशोक खरात याला आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. खरातला नाशिक पोलिसांनी आज कोर्टात हजर केले होते. सरकारी वकिलांनी जोरदार युक्तीवाद करत खरातच्या विरोधात अनेक पुरावे आहेत, काही पीडित महिला आता हळूहळू तक्रारीसाठी पुढे येत असल्याचा दाखला देत कोठडीत वाढ मागवली होती. अशोक खरात याच्याकडूनही एक पिस्टल जप्त करण्यात आले असून त्याने ५ जणांचा नरबळी दिल्याचा संशय कोर्टात व्यक्त केला आहे. महिला लैंगिक अत्याचार, जमीन हडपणे, अघोरी विधीनंतर आता नरबळीचं प्रकरण समोर आले आहे. अशोक खरात याचे एकापेक्षा एक धक्कादायक कारनामे समोर येत आहेत. (Ashok Kharat human sacrifice allegation court hearing)
खरातने खडे कुठून आणले, जे मिश्रित पाणी द्यायचे ते कुठून आणले? त्याच्याकडे २१ जिवंत काडतुसे आणि ५ वापरलेली काडतुसे सापडली आहेत, असा दावा कोर्टात वकिलांनी केला आहे. तो कस्तुरी वापरत होता, ती हरणाची शिकार करून आणली होती का? याचा तपास करायचा आहे. 'सिद्ध दोष पूजा' करण्यासाठी तो सांगत असे. तो जे वाघ आणि साप दाखवायचा, ते जिवंत होते की नकली? याचाही तपास करायचा आहे. पीडित महिलांची संख्या वाढत असल्याने पोलीस कस्टडी हवी आहे. अघोरी कृत्याविरोधात कायदा असतानाही तो ही कृत्ये करत होता, असा युक्तीवाद कोर्टात वकिलांनी मांडला.
सरकारी वकील काय म्हणाले ?
"घरझडतीत राजमुद्रा सापडल्या आहेत. पिस्तुलाच्या माध्यमातून ५ जणांचा नरबळी दिल्याचा संशय असून, त्याबाबतचे पुरावेही मिळाले आहेत. घरामध्ये अनेक मालमत्तांची कागदपत्रे सापडली असून, त्याने अनेकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. आरोपी ६७ वर्षांचा असून तो ३० वर्षांच्या मुलीवर अत्याचार करताना (चित्रीकरणात) दिसतो. जप्त केलेल्या पिस्तुलाद्वारे ५ जणांचा नरबळी दिला असावा, असा संशय आहे. मागील ७ दिवसांच्या पोलीस कोठडीत (PCR) तपासादरम्यान अनेक अघोरी कृत्ये समोर आली आहेत. तो साप कुठून आणत होता, याचाही तपास करायचा आहे," असे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले.
खरातचा वकील काय म्हणाले ?
७ दिवसांच्या तपासात मला शंका आहे. व्हिडीओ मीडिया आणि सोशल मीडियात गेले आहेत. लॅपटॉप, डिव्हीआरचा उल्लेख होतो आहे, पण पेंड्राईव्हचा उल्लेख का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पिस्टलचा परवाना होता. सगळा तपास झाला आहे कस्टडी कशासाठी पाहिजे आहे असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.