₹५०० चा गॅस फुकटात मिळणार, १ लाखाचं बक्षीसही मिळणार, पण कुणाला? वाचा काय आहे बंपर योजना

MGL PNG offer free gas 500 rupees India 2026 : एलपीजी गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर MGL ने ग्राहकांसाठी मोठी ऑफर जाहीर केली आहे. नवीन पीएनजी कनेक्शनवर ५०० रुपयांचा मोफत गॅस आणि १ लाखांपर्यंत बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.
MGL PNG offer free gas 500 rupees
MGL PNG offer free gas 500 rupeesSaam
Published On

PNG gas connection Update News : आखाती देशातील युद्धामुळे भारताला गॅस सिलिंडरच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. तासंतास गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभं राहावे लागत आहे. गॅस बुकिंग केल्यानंतरही १५ दिवस सिलिंडर मिळत नाही, पण याच अडचणीच्या काळात सर्वसामान्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. घरगुती गॅस आणि इंधनाचा पुरवठा विनाअडथळा व्हावा, यासाठी 'महानगर गॅस लिमिटेड'ने (MGL) कंबर कसली असून ग्राहकांसाठी खास ऑफर्सचा पाऊस पाडला आहे. नवे कनेक्शन घेणाऱ्यांसाठी खास योजना जाहीर केली आहे. नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ५०० रुपयांचा मोफत गॅस आणि १ लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आली आहे. (how to apply for PNG gas connection MGL benefits)

देशातील ऊर्जेची वाढती गरज आणि इंधनाचे दर लक्षात घेता, ग्राहकांना स्वस्त आणि सुरक्षित पर्याय देण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एलपीजी गॅसचे कनेक्शन असणाऱ्यांनी जर पीएनजी घरगुती पाईप गॅसचे कनेक्शन घेतल्यास त्यांना प्राधान्य द्यावे, असे सरकारने स्पष्ट सांगितलं होतं. त्यानंतर आता महानगरकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय गेल्या काही दिवसांपासून महानगर गॅसच्या नावाने अनेकजण फसवणूक करतात, त्यावरही कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

MGL PNG offer free gas 500 rupees
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात सर्वात मोठी घसरण! तब्बल ३३ हजारांनी झालं स्वस्त; वाचा खरेदीची हीच योग्य वेळ आहे का?

नेमकी योजना आहे तरी काय ?

१६ मार्च २०२६ पासून सर्व नवीन पीएनजी गॅस कनेक्शनच्या नोंदण्यांवर ५०० रुपयांचा गॅस मोफत मिळणार आहे. नोंदणी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला एक 'स्क्रॅच कार्ड' मिळेल, ज्याद्वारे २५० रुपयांपासून ते थेट १ लाख रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे जिंकता येणार आहेत. त्याशिवाय नवीन इमारतींमधील ग्राहकांना गॅस बिलात १००० रुपयांपर्यंतची सूट दिली जाणार आहे. मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, चित्रदुर्ग, दावणगेरे, लातूर आणि धाराशीव या शहरात महानगरकडून सेवा दिली जाते.

MGL PNG offer free gas 500 rupees
Kharat Case : भोंदू खरातच्या संपर्कात बड्या महिला नेत्या; निवडणुकीत विजयासाठी 'अघोरी' विद्येचा आधार? लवकरच होणार चौकशी

संकेतस्थळावर नोंदण्यांसाठी प्रत्येक ग्राहकाला रु 500 ची तत्काळ सूट आणि वापर नसलेल्या काळात किमान शुल्क माफ करण्यात येणार आहे. त्याशिवाय लवकरच शून्य आगाऊ नोंदणी शुल्क सुरु करण्यात येणार आहे. त्यामध्ये पैसे फक्त व्यवहार पूर्ण झाल्यावरच भरावे लागतील असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. व्यावसायिक ग्राहकांसाठी नोंदणी शुल्के माफ करत आहे. कंपनी स्वखर्चाने डाऊनस्ट्रीम इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा उभारणार आहे, असे कंपनीने सांगितलेय.

फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांना सूचना

अज्ञात लिंक्सवर क्लिक करू नका

APK फाईल्स डाउनलोड करू नका

OTP किंवा बँकेचा तपशील शेअर करू नका

केवळ MGL च्या अधिकृत व्हॉट्सॲप नंबर +91 98992 03843 (व्हेरिफाइड ब्लू टिक) वरच विश्वास ठेवा

MGL PNG offer free gas 500 rupees
Ladki Bahin Yojana : पात्र असतानाही ₹१५०० बंद का झाले? या ठिकाणी मिळणार अर्जाची सर्व अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com