

ladki bahin yojana february-march installment Update : महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, याकडे राज्यातील लाखो महिलांच्या नजरा खिळल्या आहेत. मार्च महिना संपत आला पण अद्याप १८ , १९ व्या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नव्हती. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा सवाल लाडक्या बहिणींकडून उपस्थित केला जात आहे. आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत अपडेट समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, लवकरच खात्यात फेब्रुवारी महिन्याचे १५०० रूपये जमा होणार आहेत. याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे समजतेय.
लाडकीच्या खात्यात कधी जमा होणार हप्ता ? - Ladki Bahin Yojana February March installment date
राज्य सरकारकडून फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. लवकरच पात्र महिलांच्या खात्यात १८ वा हप्ता जमा होणार आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, २.४ कोटी पात्र महिलांच्या बँक खात्यात १५०० रूपयांचा लाभ जमा होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. महिला आणि बाल विकास मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत फेब्रुवारी महिन्याचे १५०० रूपये पात्र महिलांच्या खात्यात डीबीटीद्वारे ट्रान्सफर केले जाणार आहे. आधार कार्ड आणि बँक खाते संलग्न असेल त्यांच्या खात्यात १५०० रूपये जमा होतील.
महिलांच्या खात्यात ३,००० रुपये जमा होणार ? Will Ladki Bahin beneficiaries get 3000 rupees together
काही प्रसार माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी-मार्च या दोन महिन्यांचे ३ हजार रूपये जमा होणार आहे. १५ एप्रिल पर्यंत महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. प्रत्येक महिन्याला खात्यात जमा होणाऱ्या हप्त्याला उशीर होत असला तरी दोन हप्ते एकत्र जमा होतील, असे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले जातेय. पण यावर अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
खात्यात पैसे जमा झाले की नाही, कसे तपासाल? How to check Ladki Bahin Yojana payment history online
लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही, याबाबतची माहिती मिळेल. लाभार्थ्यांना हप्त्याची माहिती चेक करण्याच्या सोप्या स्टेप्स आहेत. ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकावा. लॉगिन झाल्यावर 'अर्जाची स्थिती' (Application Status) किंवा 'पेमेंटचा इतिहास' (Payment History) या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व हप्त्यांची माहिती दिसेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.