Ashok Kharat case MLA wife involvement investigation details : भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी संबंधित प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरातच्या 'विशेष भक्त' परिवारात चक्क एका विद्यमान आमदाराच्या पत्नीचा समावेश असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून हे प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे. एका बाजूला गंभीर गुन्हेगारी आरोप आणि दुसऱ्या बाजूला प्रभावशाली व्यक्तींचा या प्रकरणाशी असलेला संबंध, यामुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
अशोक खरात याच्यावर लैंगिक शोषण, अंधश्रद्धा पसरवणे आणि आर्थिक फसवणूक यांसारखे गंभीर आरोप आहेत. तपास यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत असताना त्यांना काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. तपास यंत्रणांच्या चौकशीत खरातच्या जवळच्या वर्तुळात एका आमदाराच्या पत्नीचे नाव समोर येत आहे. ही महिला कोण आहे आणि तिची या प्रकरणातील नेमकी भूमिका काय होती, याचा तपास सध्या सुरू आहे. खरातने आपले जाळे केवळ सामान्य लोकांपर्यंतच मर्यादित न ठेवता, राजकारण, प्रशासन आणि समाजातील उच्चभ्रू कुटुंबांपर्यंत पसरवले होते, असे आता उघड होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.