मिल्कशेक मर्डर! बॉयफ्रेंडच्या प्रेमात आंधळी झाली पोलीस मुलगी; जन्मदात्या बापाला संपवलं, हादरवणारा प्लान उघड

Chandrapur murder case : चंद्रपूरमध्ये महिला पोलीस आणि तिच्या प्रियकराने वडिलांना विष देऊन ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तीन वर्षांनंतर पोलिस तपासातून खून प्रकरण समोर आले.
chandrapur milkshake killing
chandrapur milkshake killingSaam
Published On

संजय तुमराम

Chandrapur woman constable father murder case details : प्रेमात अडथळा ठरणाऱ्या बापाला मुलीने विषाचा पेला देऊन संपवल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. धक्कादायक म्हणजे, आरोपी महिला पोलीस आहे. खाकी वर्दीतील मुलीने बॉयफ्रेंडच्या मदतीने जन्मदात्या बापाचा जीव घेतला. या घटनेनंतर चंद्रपूरमध्ये आणि पोलिस दलात एकच खळबळ उडाली. ३ वर्षांपूर्वी २२ वर्षाच्या आर्यानं बापाचा खून केला होता. या प्रकऱणात आता आर्या आणि तिचा प्रियकर आशिष यांना बेड्या ठोकल्या आहेत.

बापाचं नाव रोशन करण्यासाठी खाकी वर्दी अंगावर चढवली होती, पण तिनेच आपल्या पोलीस प्रियकराच्या मदतीने जन्मदात्या पित्याचा 'विषाचा घास' देऊन काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूरमध्ये उघडकीस आला आहे. चंद्रपूर पोलीस दलाला हादरवून सोडणारी ही घटना तब्बल तीन वर्षांनंतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे समोर आली आहे. २२ वर्षीय आर्या जयंत बल्लावार पोलीस दलात कार्यरत आहे. आर्याचे तिचा सहकारी पोलीस कर्मचारी आशिष शेडमाके याच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र, आर्याच्या वडिलांचा या आंतरजातीय विवाहाला किंवा प्रेमसंबंधांना कडाडून विरोध होता. वडिलांचा हाच विरोध आर्याला आपल्या प्रेमातील अडथळा वाटू लागला.

chandrapur milkshake killing
Mumbai Police : मुंबईत खाकीला डाग! पोलीस शिपाईच बनले चोर, २ जणांनी केली १० लाखांची चोरी

आपल्या प्रियकरासोबत राहण्यासाठी आर्याने पोटच्या बापाचा जीव घेण्याचे ठरवले. २५ मार्च २०२३ रोजी आर्याने प्रेमाचे नाटक करत वडिलांना विश्वासात घेतले आणि त्यांना पिण्यासाठी मिल्कशेक दिला. मात्र या मिल्कशेकच्या प्रत्येक घोटासोबत मृत्यू काळ बनून आला होता. प्रियकर आशिषने अवघ्या ५ हजार रुपयांत विकत आणलेले विष आर्याने त्या मिल्कशेकमध्ये मिसळले होते. मिल्कशेक प्यायल्यानंतर कामावर गेलेले जयंत बल्लावार अचानक कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक किंवा 'अकस्मात मृत्यू' वाटल्याने कोणालाही संशय आला नाही.

chandrapur milkshake killing
Pune : पुण्यात नेमकं चाललंय काय? सासरचा जाच आणि निशासोबतचा वाद, मोहम्मदनं वैतागून केली आत्महत्या

काळाच्या ओघात हे प्रकरण दबले गेले होते. पण पोलिसांना या प्रकरणाबाबत गोपनीय माहिती मिळाली. तांत्रिक पुराव्यांची साखळी जोडत तपास चक्र फिरवल्यानंतर जयंत बल्लावार यांचा मृत्यू नैसर्गिक नसून तो एक सुयोजित खून असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तातडीने हालचाली करत आर्या, तिचा प्रियकर आशिष आणि इतर दोन साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत.

chandrapur milkshake killing
रुग्णालयातील चिल्ड्रेन वॉर्डला आग, ४० चिमुकल्यांचे प्राण धोक्यात, जीवाच्या आकांताने पालकांची पळापळ, नेमकं काय घडलं?

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com