रुग्णालयातील चिल्ड्रेन वॉर्डला आग, ४० चिमुकल्यांचे प्राण धोक्यात, जीवाच्या आकांताने पालकांची पळापळ, नेमकं काय घडलं?

Massive Fire in Children’s Ward at Jabalpur : जबलपूरच्या सरकारी मेडिकल कॉलेजमधील चिल्ड्रन वॉर्डमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. ४० हून अधिक रुग्णांना तत्काळ बाहेर काढत मोठी दुर्घटना टळली.
रुग्णालयातील चिल्ड्रेन वॉर्डला आग, ४० चिमुकल्यांचे प्राण धोक्यात, जीवाच्या आकांताने पालकांची पळापळ, नेमकं काय घडलं?
Published On

Jabalpur hospital fire news : जबलपूरमधील सरकारी मेडिकल कॉलेजमधील चिल्ड्रेन वॉर्डमध्ये अचानक भीषण आग लागली. ही आग लागली त्यावेळी वॉर्डमध्ये ४० जणांवर उपचार सुरू होते. आगीमुळे धुराचे लोट दिसताच पालकांनी चिमुकल्यांना घेऊन धाव घेतली. काय वेळासाठी रूग्णालयातील परिस्थिती अतिशय भयंकर झाली होती. जिकडे तिकडे आरडाओरड आणि धावपळ सुरू होती. सुदैवाने या दुर्घटनेत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. डॉक्टर, नर्स आणि रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीमुळे मोठी दुर्घटना टळली.

मध्य प्रदेशातील जबलपूरमधील नेताजी सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेजमधील चिमुकल्यांच्या वॉर्डात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. क्षणात वॉर्डमध्ये धुराचे लोट पसरले. अन् एकच गोंधळ उडाला. आपल्या चिमुकल्यांचा जीव वाचवण्यासाठी पालकांनी जीवाच्या आकांताने पळापळ केली. सुदैवाने वेळेवर मदत मिळाल्याने मोठी दुर्घटना टळली.

रुग्णालयातील चिल्ड्रेन वॉर्डला आग, ४० चिमुकल्यांचे प्राण धोक्यात, जीवाच्या आकांताने पालकांची पळापळ, नेमकं काय घडलं?
MP News : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतणाऱ्या बसची ट्रकला धडक, भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू

गुरुवारी रात्री उशिरा महाविद्यालयातील चिल्ड्रन्स वॉर्ड क्रमांक ८ च्या स्टोअररूममधील पंख्याला अचानक आग लागली अन् एकच भितीचे वातावरण पसरले. धुराचे लोट आल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. स्थानिक मीडियाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे स्टोअररूममधील पंख्याला आग लागली. त्यानंतर धुराचे लोट बाहेर पडू लागले. ही दुर्घटना झाली, त्यावेळी ४० पेक्षा जास्त चिमुकल्यांवर वॉर्डात उपचार सुरू होते.

रुग्णालयातील चिल्ड्रेन वॉर्डला आग, ४० चिमुकल्यांचे प्राण धोक्यात, जीवाच्या आकांताने पालकांची पळापळ, नेमकं काय घडलं?
Kharat Case : भोंदू खरातच्या संपर्कात आमदाराची बायको, ती कोण? चर्चेनं महाराष्ट्रात खळबळ

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीचा अचानक भडका उडाला. धूर आणि आग वेगाने पसरताना पाहिल्यानंतर वॉर्डमध्ये दाखल असलेल्या मुलांचे कुटुंबीय आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण झाले. परिस्थिती इतकी गंभीर झाली की कुटुंबीय आपल्या मुलांना कवेत घेऊन आणि प्रसूतीसाठी आलेल्या महिलांसोबत वॉर्डमधून बाहेर पळ काढला. आगीनंतर वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे दुर्घटना टळली.

रुग्णालयातील चिल्ड्रेन वॉर्डला आग, ४० चिमुकल्यांचे प्राण धोक्यात, जीवाच्या आकांताने पालकांची पळापळ, नेमकं काय घडलं?
Kharat Case : मुख्यमंत्री फडणवीसांची खुर्ची घालवण्यासाठी अघोरी पूजा; ३८ आमदारांनी खरातकडे बोट कापलं, महाराष्ट्राला हादरवणारे दावे

आग लागल्याची माहिती समजताच तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. रूग्णालयातील कर्मचारी आणि अग्निशमन दलाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. रूग्णालयात दुर्घटनेवेळी असणारे प्रदीप देहरिया यांनी नेमकं झालं काय, याची सर्व माहिती दिली. या दुर्घटनेत एका नवजात बाळाचा मृत्यू झाला. आगीच्या धुरामुळे इतर काही मुलांची प्रकृतीही खालावल्याचे ते म्हणाले. मात्र, पोलीस आणि रुग्णालय व्यवस्थापनाने हा दावा फेटाळून लावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com