Kharat Case : मुख्यमंत्री फडणवीसांची खुर्ची घालवण्यासाठी अघोरी पूजा; ३८ आमदारांनी खरातकडे बोट कापलं, महाराष्ट्राला हादरवणारे दावे

Jitendra Awhad statement on CM Devendra Fadnavis : जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ३८ आमदारांनी अघोरी पूजा करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या खुर्चीवर डोळा ठेवला असल्याचा दावा समोर आला आहे.
Jitendra Awhad statement on CM Devendra Fadnavis
Jitendra Awhad statement on CM Devendra FadnavisSaam
Published On

38 MLAs black magic ritual allegation Maharashtra : देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिपदापासून दूर करण्यासाठी राज्यातील अनेक आमदारांनी खरातकडे जाऊन पूजा केल्याचा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे विधानसभेत मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली असून सामाजिक क्षेत्रातही संताप व्यक्त केला जात आहे. खरात प्रकरणात दररोज नवनवीन दावे केले जात आहेत. खरातला वाचवण्यासाठी पैसे घेतले जात असून मोठे अधिकारी तिथे लोटांगण घालत असल्याचा आरोप आव्हाडांनी केला. अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत अशोक खरात प्रकरणावरून अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात केवळ काळी जादू किंवा अघोरी प्रथांचाच समावेश नाही, तर थेट सत्तेच्या राजकारणासाठी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा आव्हाडांनी केला आहे.

Jitendra Awhad statement on CM Devendra Fadnavis
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांचं थेट निवडणूक आयोगाला पत्र; तटकरे-पटेलांच्या वर्चस्वाला धक्का?

अशोक खरातकडे जाऊन काही जण अघोरी पूजा करत होते. या पूजेचा मुख्य उद्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीला सुरुंग लावणे हा होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला. "खरातकडे जाऊन ३८ आमदारांनी करंगळ्या कापल्याची यादी माझ्याकडे आहे, योग्य वेळी नावे जाहीर करेन," असा दावाही आव्हाड यांनी केला आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, सत्तेसाठी अघोरी विद्येचा वापर करण्याच्या दाव्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

Jitendra Awhad statement on CM Devendra Fadnavis
New Rule : मोदी सरकारचा मोठा निर्णय, PNG कनेक्शन असेल तर LPG गॅस सिलिंडर बंद

अशोक खरातबद्दलची माहिती मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना आणि पोलिसांना असायला हवी होती, मात्र हे पोलिसांचे 'इंटेलिजन्स फेल्युअर' असल्याचा गंभीर आरोप आव्हाडांनी केला. तसेच, या आरोपीला वाचवण्यासाठी काही मोठ्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. "या सर्व प्रकाराची आणि खरातसोबत झालेल्या बैठकांची माहिती मुख्यमंत्री महोदयांना सहा महिन्यांपूर्वीच मिळाली होती," असा दावाही आव्हाडांनी यावेळी केला.

Jitendra Awhad statement on CM Devendra Fadnavis
Kharat Case : जयंत पाटलांनी रक्ताने अंघोळ केली, नरबळी दिला का? भाजप नेत्याच्या आरोपानं खळबळ

अशोक खरातने २००७ मध्ये बाळू तुपे नावाच्या पत्रकाराची पहिली हत्या केली होती, असा उल्लेख आव्हाडांनी केला. इतका गंभीर गुन्हेगारी इतिहास असतानाही खरातच्या देवस्थानला विकासकामांसाठी सरकारी निधी दिला गेल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. सिन्नर येथील खरातच्या देवस्थानसाठी सरकारी तिजोरीतून कमानी आणि टाक्या बांधल्या गेल्या. एका काळ्या जादू करणाऱ्या व्यक्तीला अशा प्रकारे राजमान्यता मिळणे हे महाराष्ट्राच्या परंपरेला घातक असल्याचे आव्हाड म्हणाले.

Jitendra Awhad statement on CM Devendra Fadnavis
Government Schemes : राज्यातील 'ही' योजना बंद झाली का? दीड वर्षांपासून लाभच नाही, नेमकी स्थिती काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com