Kharat Case : जयंत पाटलांनी रक्ताने अंघोळ केली, नरबळी दिला का? भाजप नेत्याच्या आरोपानं खळबळ

Kharat case latest political controversy Maharashtra : खरात प्रकरणात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत राजकारणात खळबळ उडवली. या प्रकरणात चौकशीची मागणी जोर धरतेय.
Gopichand Padalkar allegations against Jayant Patil
Gopichand Padalkar allegations against Jayant PatilSaam TV Marathi
Published On

Gopichand Padalkar allegations against Jayant Patil : नाशिकमधील भोंदू अशोक खरात या प्रकरणात दररोज नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. अनेक राजकीय नेते खरातच्या दारात केल्याचा दावा केला जातोय. आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर अतिशय गंभीर आरोप केला आहे. जयंत पाटील यांनी खरातकडे रक्ताने अंघोळ केली आहे, कुणाचा नरबळी दिला आहे? जयंत पाटील आणि त्यांचा मुलगा दोन दोन दिवस त्यांच्याकडे होते, अशी माहिती स्थानिक कार्यकर्त्यांनी दिल्याचे पडळकर म्हणाले.

गर्भवती महिलेवर अन्याय अत्याचार करतो, तो जयंत पाटील यांचा गुरू आहे. ईश्वरपूरमध्ये खरातने दोन दिवस पूजा केली. जयंत पाटील आणि त्यांचा मुलगा दर्शनासाठी दोन दिवस नाशिकमध्ये होते. रक्ताच्या अंघोळी यांनी केल्याचे कार्यकर्ते सांगतात. पाच नरबळी दिल्याचे समोर आले आहे, त्यातील एक जंयत पाटील यांनी दिला आहे का? अशी शंका येत असल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. त्यांनी याची सखोल चौकशी कऱण्यात यावी, असेही म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com