Pune Fire : पुण्यात पेट्रोल पंपाला भीषण आग, परिसरात जिकडे तिकडे धुराचे लोट, पाहा नेमकं झालं काय?

Pune petrol pump fire : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील पेट्रोल पंपावर भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून जीवितहानी झाली नाही.
Pune petrol pump fire Ahilyanagar highway details
Pune petrol pump fire Ahilyanagar highway details Saam TV Marathi
Published On

Pune petrol pump fire Ahilyanagar highway details : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील एका पेट्रोल पंपावर भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. जितडे तिकडे धुराचे मोठे लोट आकाशात स्पष्टपणे दिसत आहेत. पेट्रोल पंपावर आग लागल्यानंतर महामार्गावरही काही वेळ वाहतूककोंडी झाली होती. सुदैवाने या दुर्दैवी घटनेत कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. स्थानिकांनी आणि अग्निशमन दलाकडून तातडीने आग आटोक्यात आणली गेली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे-अहिल्यानगर मार्गावर असलेल्या एका पेट्रोल पंपाच्या पाठीमागील बाजूस अचानक ही आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र पाठीमागील भागात असलेल्या साहित्याने पेट घेतल्याने आग भडकल्याचे सांगितले जात आहे. पेट्रोल पंपावर इंधनाचा साठा असल्याने ही आग अधिक पसरण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यामुळे महामार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला होता.

Pune petrol pump fire Ahilyanagar highway details
Mumbai Police : मुंबईत खाकीला डाग! पोलीस शिपाईच बनले चोर, २ जणांनी केली १० लाखांची चोरी

पेट्रोल पंपावर आग लागलेल्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. मुख्य इंधन साठ्यापर्यंत आग पोहोचू नये, यासाठी विशेष काळजी घेतली गेली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Pune petrol pump fire Ahilyanagar highway details
Pune : पुण्यात नेमकं चाललंय काय? सासरचा जाच आणि निशासोबतचा वाद, मोहम्मदनं वैतागून केली आत्महत्या

पुण्यात पेट्रोल, डिझेलचा मुबलक साठा, पंपावर गर्दी करू नका

पुण्यातील सर्व पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल यांचा मुबलक साठा उपलब्ध आहे तसेच कंपन्यांकडून सुद्धा सुरळीत पुरवठा सुरू आहे. घाबरून जाऊन पेट्रोल पंपावर गर्दी करू नका, पुण्यातील कुठल्या ही पेट्रोल पंप ड्राय झालेले नाहीत अशी माहिती पेट्रोल डिझेल असोसिएशन चे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी दिली आहे. पंपावर गर्दी केल्याने पेट्रोलचा साठा लवकर संपतो मग पुढील साठा येण्यासाठी थांबावे लागते. काही जणं लोकांना संभ्रम अवस्थेत टाकणारे वक्तव्य करत आहेत पण त्याकडे कोणीही लक्ष देऊ नका असं आवाहन रुपारेल यांनी केलं आहे.

Pune petrol pump fire Ahilyanagar highway details
मिल्कशेक मर्डर! बॉयफ्रेंडच्या प्रेमात आंधळी झाली पोलीस मुलगी; जन्मदात्या बापाला संपवलं, हादरवणारा प्लान उघड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com