कल्याणजवळ भयंकर अपघात, मेलखाली व्यक्तीचा मृत्यू; इंजिनमध्ये अडकले मृतदेहाचे तुकडे, मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली

Train accident Titwala station : टिटवाळा स्थानकात पंजाब मेलखाली येऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मृतदेहाचे तुकडे इंजिनमध्ये अडकल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे दीड तास विस्कळीत झाली.
Titwala train accident
Titwala train accidentसाम टीव्ही
Published On

मयूर राणे, मुंबई प्रतिनिधी

Titwala train accident : टिटवाळा रेल्वे स्थानकात गुरूवारी रात्री एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. रेल्वे रुळ ओलांडण्याच्या नादात एका अज्ञात व्यक्तीचा पंजाब मेलखाली येऊन जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भयंकर होता की मृतदेहाचे काही भाग रेल्वेच्या इंजिनमध्ये अडकले होते. ते बाहेर काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाला इंजिनमधील कॅटल गार्डचा काही भाग कापावा लागला. या भीषण अपघातामुळे कल्याण-कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक सुमारे सव्वा ते दीड तास पूर्णपणे विस्कळीत झाली होती. याचा मोठा फटका रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांना बसला. (Titwala train accident Punjab Mail incident details)

मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री ९ वाजून १० मिनिटांच्या सुमारास टिटवाळा स्थानकातून पंजाब मेल एक्सप्रेस जात होती. यावेळी एक अज्ञात व्यक्ती रुळ ओलांडत होता. त्याचवेळी वेगात असणारी पंजाब एक्सप्रेसची त्या व्यक्ताला जोरात धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मात्र अपघातानंतर तांत्रिक अडचण निर्माण झाली. मृत व्यक्तीच्या शरीराचे काही तुकडे पंजाब मेलच्या इंजिनच्या 'कॅटल गार्ड'मध्ये (इंजिनच्या पुढचा भाग) अडकले होते.

Titwala train accident
Kharat Case : भोंदू खरातच्या संपर्कात आमदाराची बायको, ती कोण? चर्चेनं महाराष्ट्रात खळबळ

रेल्वे प्रशासनाने तातडीने गाडी थांबवून अडकलेले अवयव काढण्याचा प्रयत्न केला. पण ते सहजासहजी निघत नव्हते. अखेर इंजिनचे कॅटल गार्ड कापून ते मृतदेहाचे तुकडे बाहेर काढावे लागले. यामध्ये एक ते दीड तासांचा वेळ गेल्याने पंजाब मेल रात्री १० वाजून ५३ मिनिटांपर्यंत टिटवाळा स्थानकातच थांबून होती. इंजिनची दुरुस्ती आणि स्वच्छता केल्यानंतर ही गाडी मार्गस्थ करण्यात आला. पण दुसरीकडे या घटनेचा परिणाम लोकल वाहतुकीवरही झाला.

Titwala train accident
Kalyan Accident : तरूण उद्योजकाचा अपघाती मृत्यू; नवी सायकल घेऊन रायडिंगला गेला, भरधाव कारनं उडवलं, CCTV

या अपघातामुळे कल्याणहून कसारा दिशेला जाणाऱ्या सर्व लोकल गाड्या आणि उत्तर भारतात जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या एकामागोमाग एक थांबवून ठेवाव्या लागल्या. दिवसभराच्या कामानंतर घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना यामुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. टिटवाळा स्थानकाप्रमाणेच आज विरार-वैतरणा दरम्यानही अशाच एका घटनेमुळे पश्चिम रेल्वेचे वेळापत्रकही कोलमडले होते.

Titwala train accident
Kalyan : कल्याण हादरलं! फार्मा कंपनीच्या मॅनेजरची आत्महत्या; बँक स्टेटमेंट तपासताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com