Kalyan Accident : तरूण उद्योजकाचा अपघाती मृत्यू; नवी सायकल घेऊन रायडिंगला गेला, भरधाव कारनं उडवलं, CCTV

Kalyan road accident latest updates : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवत सायकलस्वार व्यावसायिकाला धडक दिल्याने मृत्यू झाला. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेनंतर पोलिसांनी मुलासह पालकांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Kalyan road accident latest updates
Kalyan road accident latest updates साम टीव्ही
Published On

संघर्ष गांगुर्डे/साम टीव्ही न्यूज/कल्याण

minor driving accident in Kalyan ring road CCTV video : कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलाचा निष्काळजीपणा एका नामांकित व्यावसायिकाच्या जीवावर बेतला आहे. भरधाव कारने सायकलिंग करणाऱ्या व्यावसायिकाला जोरदार धडक दिली. त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

अल्पवयीन मुलाने घरातून कारची चावी घेऊन कार रिंग रोडवर नेली. स्टिअरिंगवरून ताबा सुटल्याने त्याने रस्त्यावर सायकलिंग करणाऱ्या व्यक्तीला धडक दिली. या धडकेत कल्याणमधील नामांकित व्यावसायिक श्रीनिवास तांदळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणात खडकपाडा पोलिसांनी कार जप्त केली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन चालकासह त्याच्या आईविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर मुलाच्या आईची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिला अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, गांधारी रिंग रोड हा अपघातांचा 'हॉटस्पॉट' बनत चालल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन, निष्काळजीपणे वाहन चालवणे आणि अपुरी वाहतूक नियंत्रण व्यवस्था यामुळे अशा घटनांत वाढ होत असल्याची चर्चा आहे.

Kalyan road accident latest updates
कॅन, बाटल्या, ड्रममध्ये पेट्रोल-डीझेल मिळणार नाही; पंपांवरील रांगांमुळं सरकारचा निर्णय

या प्रकरणात अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांच्या हातात वाहन न देण्याचे आवाहन वाघमोडे यांनी जनतेला केले आहे. कल्याणमधील गांधारी जवळून जाणारा रिंग रोड आता भरधाव कारचालकांमुळे अपघातांचा हॉटस्पॉट ठरला आहे. या रिंग रोडवर सुरू असलेले मुजोर वाहनचालकांचे स्टंट आता मॉर्निंग वॉक आणि सायकलिंग करणाऱ्या नागरिकांच्या जीवावर बेतू लागले आहेत. मंगळवारी रात्री श्रीनिवास तांदळे हे व्यावसायिक रिंग रोडवर सायकलिंग करत असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने त्यांना धडक दिली. या धडकेत श्रीनिवास तांदळे यांचा मृत्यू झाला. अपघाताचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. धक्कादायक म्हणजे ही कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. रात्री खडकपाडा पोलिसांनी कार जप्त केली होती, तर मुलगा पळून गेला होता. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Kalyan road accident latest updates
देशातील परिस्थिती किती गंभीर? सर्वपक्षीय बैठकीत सरकारनं दिली अपडेट, पाकिस्तानला म्हटलं दलाल

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलांकडून अपघातांचे सत्र सुरूच आहे, मात्र काही पालक या संदर्भात गांभीर्य दाखवत नाहीत. याचा परिणाम असा होतो की त्यांच्या मुलांमुळे निष्पाप लोकांचा जीव जातोय. या प्रकरणात मुलाच्या वडिलांविरोधात देखील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. याबाबत कल्याणमधील नामांकित सायकलिंग ग्रुपच्या सदस्य डॉक्टर रहेनुमा आयते शामुद्दीन यांचे म्हणणे आहे की, ज्या रस्त्यावर अपघात झाला आहे त्या रस्त्यावर बॅरिकेडिंग करण्यात आले होते. मात्र काही दिवसांपासून त्या ठिकाणी लावलेले बॅरिकेड्स हटवण्यात आले. बॅरिकेड्स हटवल्याने या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली असून त्याचा फटका मॉर्निंग वॉक, जॉगिंग आणि सायकलिंग करणाऱ्यांना बसत आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. गुरुवारी या संदर्भात सायकलिंग ग्रुप आणि कल्याणमधील नामांकित व्यक्ती आंदोलन करणार आहेत. या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिचे नाव कामिनी योगेश पांडे आहे.

Kalyan road accident latest updates
मोठी बातमी! राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर १७९८.७८ कोटी जमा, कोणत्या जिल्ह्यात किती पैसे?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com