

Namo Shetkari 8th installment amount district wise Maharashtra : राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे २ हजार रूपयांचे वितरण करण्यात आले. राज्यात शेतकऱ्यांच्या खात्यात खटाखट १७९८.७८ कोटी झाले आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत केली जाते. प्रधानमंत्री किसान योजनेतून पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकवर्षी ६ हजारांचे अनुदान मिळते, त्यात राज्य सरकारकडून आणखी सहा हजारांची भर गालण्यात येते. राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांना १२ हजार रूपयांची मदत केली जाते. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज आठवा हप्ता जमा झालेला आहे. शेतकऱ्यांनी तात्काळ आपले खाते तपासावे. (PM Kisan Yojana installment)
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आठव्या हप्त्या पोटी एकूण ८९,७५,२९८ शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर एकूण १७९८.७८ कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट लाभ हस्तांतरण द्वारे वितरित करण्यात आले. विधान भवन, मुंबई येथे ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा आठवा हप्ता वितरण समारंभ झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना किती रूपये मिळाले?
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आठव्या हप्त्यात जिल्हानिहाय रक्कम वितरित करण्यात आली आहे. अहिल्यानगर ₹१०८.३० कोटी, अकोला ₹३६.७६ कोटी, अमरावती ₹५३.३४ कोटी, बीड ₹७२.७० कोटी, भंडारा ₹४१.६५ कोटी, बुलढाणा ₹६६.७४ कोटी, चंद्रपूर ₹४७.९५ कोटी, छत्रपती संभाजीनगर ₹६८.१८ कोटी, धाराशिव ₹४६.८५ कोटी, धुळे ₹३०.६३ कोटी, गडचिरोली ₹२८.५० कोटी, गोंदिया ₹४२.४५ कोटी, हिंगोली ₹३५.०० कोटी, जळगाव ₹७७.४० कोटी, जालना ₹५८.८२ कोटी, कोल्हापूर ₹९२.३३ कोटी, लातूर ₹५३.८७ कोटी, नागपूर ₹३३.८८ कोटी, नांदेड ₹७६.५० कोटी, नंदुरबार ₹२०.४७ कोटी, नाशिक ₹८३.८६ कोटी, पालघर ₹१९.९५ कोटी, परभणी ₹४९.७९ कोटी, पुणे ₹८५.२४ कोटी, रायगड ₹२२.७९ कोटी, रत्नागिरी ₹ ३१.२१ कोटी, सांगली ₹७५.४९ कोटी, सातारा ₹८७.०७ कोटी, सिंधुदुर्ग ₹२३.५३ कोटी, सोलापूर ₹९७.५२ कोटी, ठाणे ₹१४.१८ कोटी, वर्धा ₹२५.६० कोटी, वाशिम ₹३३.०५ कोटी आणि यवतमाळला ₹५७.१८ कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे.
‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेंतर्गत २४ मार्च २०२६ अखेर एक ते सात हप्त्यांमध्ये एकूण १३०१७.३० कोटी रुपये ९३.०८ लाख शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरण द्वारे जमा करण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.