मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 6 मार्च महाराष्ट्राचा अर्थसंकल सादर केला. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केले. महत्वाचे म्हणजे दिवंगत अजित पवार यांनी अर्थसंकल्पाची बहुतांश तयारी केली होती. त्यामुळे अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत हा अर्थसंकल्प त्यांना समर्पित करत असल्याचे सांगितले.
अर्थसंकल्पात बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून शेती क्षेत्राच्या विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. राज्यातील १० ते १५ ठिकाणी एकत्रित मूल्य साखळी (Value Chain) निर्माण करण्याचा सरकारचा मानस आहे. तसेच ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव आणि शेतीसंबंधित महत्त्वाची माहिती उपलब्ध करून दिली जात असल्याचे सांगण्यात आले. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) मदत घेत संशोधन आणि मार्गदर्शन केले जात असून त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत असल्याचा दावा करण्यात आला. तसेच ‘अॅग्रीस्टॅक’ योजना राबविण्यात येत असून फेब्रुवारीपर्यंत १ कोटी ३१ लाख शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झाल्याची माहिती देण्यात आली.
याशिवाय पुढील चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जाणार आहे. महिला गोपालक आणि शेळीपालकांसाठीही विशेष योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. राज्याची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्राचे सकल उत्पादन १२३ अब्ज डॉलरवरून १५०० अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्राला जागतिक उत्पादन केंद्र (Global Manufacturing Hub) बनवण्याचा सरकारचा संकल्प असल्याचेही अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.