Maharashtra politics : महाराष्ट्रात पुन्हा विधानसभेसाठी मतदान, २ ठिकाणी लागणार पोटनिवडणुका

Maharashtra by-election : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पोटनिवडणुकांचे वातावरण तयार होत आहे. अजित पवार आणि शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघ रिक्त झाले असून, लवकरच निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Baramati by-election 2026 update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुका लागण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसोबत महाराष्ट्रातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जातोय. बारामती आणि राहुरी या मतदारसंघात पुन्हा एकदा निवडणुका लागू शकतात. बारामतीची पोट निवडणूक बिनविरोध होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमधून सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात.

पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात लवकरच पोटनिवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीची जागा रिक्त झाली आहे, तर आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. निवडणूक आयोगाकडून या दोन्ही जागांसाठी लवकरच अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com