वावरात अफूची शेती, उद्धव ठाकरेंच्या आदेशाने बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी; राजकीय वर्तुळात खळबळ

Uddhav Thackeray Strict Action Against Party Leader: धाराशिव जिल्ह्यात अफूची बेकायदेशीर शेती उघडकीस आल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने तात्काळ हकालपट्टी केली आहे.
Police officials inspect seized opium plants from a farm in Dharashiv district, Maharashtra.
Police officials inspect seized opium plants from a farm in Dharashiv district, Maharashtra.Saam Tv
Published On

बालाजी सुरवसे, साम टीव्ही

ठाकरे गटाचा धारशिव जिल्ह्यातील वाशी उपतालुकाप्रमुख समाधान उघडे याच्या शेतातून तब्बल 485 किलोची अफूची झाडे जप्त करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. जिल्ह्यातील वाशी तालुक्यामध्ये असलेल्या दशमेगावात शिवारात या उघडेने त्याच्या शेतात कांद्यापिकाच्या अफूच्या पिकाची लागवड केली आहे, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने धाड टाकत तपासणी केली असता शेतात मोठ्या प्रमाणात अफूची झाडे आढळली.

Police officials inspect seized opium plants from a farm in Dharashiv district, Maharashtra.
श्रद्धेच्या भूमीत काळा धंदा; शिर्डीतील हॉटेलमधील देहविक्री प्रकरणाने खळबळ, नेमकं काय घडलं?

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने धाड टाकत तपासणी केली असता शेतात मोठ्या प्रमाणात अफूची झाडे आढळली. बाजारभावानुसार या झाडांची किंमत 73 लाख रुपये इतकी आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने या नेत्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. धारशिव जिल्ह्याचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी याबाबत प्रसिद्धपत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे.

Police officials inspect seized opium plants from a farm in Dharashiv district, Maharashtra.
100 वर्षे जुनी शाळा विकली? बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री?

प्रसिद्धपत्रात नेमके काय म्हटले आहे?

समाधान मनोहर उघडे मौजे दसमेगाव ता. वाशी जि. धाराशिव यांनी पक्षाच्या अधिकृत धोरणांविरुद्ध जाऊन शेतात अफुची लागवड केल्याबाबतची बाब पक्षाच्या निदर्शनास आली आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली असता त्यांनी पक्षाच्या भूमिकेला बाधा आणणारे आणि पक्षशिस्त भंग करणारे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.

पक्षशिस्त आणि संघटनात्मक नियमांचे पालन प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यास बंधनकारक आहे. पक्षाच्या विचारसरणी आणि अधिकृत भूमिकेविरुद्ध जाणारी कोणतीही कृती सहन केली जाणार नाही, याची स्पष्ट जाणीव सर्वांना करून देण्यात येत आहे. वरील पार्श्वभूमीवर, पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार समाधान मनोहर उघडे यांची पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांवरून तत्काळ प्रभावाने हकालपट्टी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com