धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता येण्याची शक्यता आहे. याठिकाणी भाजप सर्वाधिक २२ जागा मिळवण्याचा अंदाज आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनाला १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. साम टीव्हीचा एक्झिट पोल समोर आला आहे. धाराशिवमध्ये ५५ जागांपैकी भाजपला २२, शिंदेसेनेला ११, काँग्रेसला ३, ठाकरेसेनेला १४, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ४ आणि इतरला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आणि वंचितला एकही जागा मिळणार नाही. सर्वाधिक २२ जागा मिळवून धाराशिवमध्ये संभाव्य सत्ता भाजपची येण्याची शक्यता आहे.
धाराशिवमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप ठरण्याची शक्यता आहे. नगरपालिकेमध्ये भाजपला मोठं यश मिळाले होते. सरकारने केलेली विकास कामं सांगण्यात भाजप यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे याठिकाणी भाजपला २२ ते २५ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना शिंदे गटाचा प्रभाव याठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रताप सरनाईक आणि तानाजी सावंत यांनी याठिकाणी जोरदार प्रचार केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.