Himachal Landslide : हिमाचलच्या मणिकर्णमध्ये भूस्खलन, ६ लोकांचा जागीच मृत्यू

Himachal Landslide update : हिमाचलच्या मणिकर्णमध्ये भूस्खलन झालंय. या दुर्घटनेत ६ लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Himachal Landslide
Himachal Landslide update :Saam tv
Published On

हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. मणिकर्णच्या गुरुद्वाराजवळ रविवारी सायंकाळी ५ वाजता घटना घडली आहे. या दुर्घटनेत ६ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर डझनभर लोक जखमी झाले आहेत. गुरुद्वाराजवळील झाड कोसळल्याने नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर रस्त्याच्या किनाऱ्यावरील झाडाखाली बसल्याने नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

हिमाचलमध्ये भूस्खलन झाल्यानंतर डोंगराचा ढिगारा झाडावर पडला. त्यानंतर झाड कोसळून रस्त्यावर पडलं. त्यामुळे रस्त्याच्या किनाऱ्यावर बसलेल्या लोकांवर हे झाड कोसळलं. या दुर्घटनेत एक विक्रेत्याचाही मृत्यू झाला आहे. तर कारमध्ये असणाऱ्या दोघांसहित तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांना घटनास्थळी ६ जणांचे मृतदेह आढळले.

Himachal Landslide
Jasprit Bumrah : राडा होणार! जसप्रीत बुमराहची खतरनाक बॉलिंग; मुंबई इंडियन्स नवा डाव टाकणार, VIDEO

पोलिसांनी ६ जणांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. एडीएम कूल्लू अश्वनी कुमार यांच्या म्हणण्यानुसार, ६ लोकांचा मृत्यू झाला आहे. यात अनेक जण जखमी झाले आहेत. दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले. आता घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाचं पथक आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एक मोठं झाड रस्त्यावर कोसळलं. भलंमोठं झाड रस्त्यावरील तीन-चार वाहनांवर कोसळलं. त्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान झालं. तर वाहनांमधील प्रवासी आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात जखमी झाले.

Himachal Landslide
Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील मटण, मासे आणि शोरमाची दुकाने बंद करा; शिवसेना नेत्याची मागणी, कारण काय?

स्थानिकांनी वाहनात अडकेल्या लोकांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी सहा जणांना मृत घोषित केले. पोलिसांच्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बचाव पथकाने तातडीने सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूस्खलन झाल्यामुळे कुल्लूला मणिकर्णहून जोडणारा रस्ता ढिगाऱ्यामुळे बंद झाला आहे. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या रांगा लागल्या आहेत. पोलीस घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com