Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील मटण, मासे आणि शोरमाची दुकाने बंद करा; शिवसेना नेत्याची मागणी, कारण काय?

Mumbai News News : मुंबईतील रस्त्यावरील मटण, मासे आणि शोरमाची दुकाने बंद करण्याची शिवसेना नेत्याने मागणी केली आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय निरुपम यांनी मागणी केली आहे.
Mumbai Latest News
Mumbai News Saam tv
Published On

मुंबई : हिंदूत्वाच्या मुद्यावर भाजपनंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. चैत्र नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यावरील मटण, मासे आणि शोरमाची दुकाने बंद करण्याची मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केली आहे. मटण, शोरमाची दुकाने नवरात्रीपर्यंत बंद करण्याची मागणी शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केली आहे. रस्त्यावरील मासांहाराची दुकाने बंद करण्याची मागणी निरुपम यांनी मुंबई पोलीस उपायुक्तांकडे केली आहे.

Mumbai Latest News
Shocking : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीचा १४ मिनिटांचा प्रायव्हेट व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

हिंदू धर्मीयांमध्ये चैत्र नवरात्र खूप खास मानली जाते. या चैत्र नवरात्रीची सुरुवात उद्यापासून होत आहे. या नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय निरुपम यांनी पोलीस प्रशासनाकडे मोठी मागणी केली आहे. नवरात्रीच्या दिवसांत रस्त्यावरील मटण, मासे आणि शोरमाची दुकाने बंद केली पाहिजे,अशी मागणी संजय निरुपम यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे. मुंबई महापालिकेच्या सहकार्याने हे बंद करण्याचा मार्ग शोधला जाईल, असे निरुपम यांनी सांगितले.

Mumbai Latest News
Prashant koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरवर वकिलाचा हल्ला; कोर्टाबाहेरील थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

संजय निरुपम म्हणाले, ' ते बेकायदेशीर आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, तुम्ही रस्त्यावर चूल पेटवू शकत नाही. तरीही रस्त्यावरील एका बाजूला गॅसवर शोरमा गरम करतात. त्याच शोरमाची विक्री करतात. तो एक बेकायदेशीरपणा आहे. तो अवैधपणा आहे. आम्ही अंधेरीत हे काम सुरु करतोय. मुंबईत संपूर्ण अशी व्यवस्था झाली. मुंबईच्या रस्त्यावर मटण, मासे आणि शोरमा विक्री बंद झाली पाहिजे'.

Mumbai Latest News
Shocking News : वंशाच्या दिव्यासाठी बाप झाला हैवान; ५ महिन्यांच्या जुळ्या मुलींना जमिनीवर आपटून ठार मारलं

माजी खासदार संजय निरुपम आणि त्यांच्य शिष्टमंडळाने आज पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेतली. या भेटीत चैत्र नवरात्री दरम्यान नाक्या-नाक्यावरील चिकन शोरमाची दुकाने बंद करण्यात यावी, ही मागणी शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केली. निरुपम यांनी रविवारी ३ वाजता पोलीस उपायुक्त गुंजाळ यांची भेट घेतली. संजय निरुप यांच्या मागणीनंतर पोलीस उपायुक्त काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com