Shocking News : वंशाच्या दिव्यासाठी बाप झाला हैवान; ५ महिन्यांच्या जुळ्या मुलींना जमिनीवर आपटून ठार मारलं

Rajasthan News : शाच्या दिव्यासाठी बाप हैवान झाल्याची घटना राजस्थानमध्ये घडली आहे. बापाने ५ महिन्यांच्या जुळ्या मुलींची हत्या केल्याचे उघड झालं आहे.
crime news
crime news Saam tv
Published On

राजस्थानच्या सीकरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. वंशाच्या दिव्यासाठी एका वडिलांनी स्वत:च्या जुळ्या मुलींची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. दोन्ही मुलींच्या हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.

crime news
Eknath Shinde Song : 'ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी...; कामराला शिंदे गटाचा जबरा उत्तर, उद्धव ठाकरेंवरही बाण, VIDEO

अशोक कुमार यादव असे आरोपीचे नाव आहे. अशोकने स्वत:च्या मुलींना जमिनीवर आपटून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलींची हत्या केल्यानंतर आरोपी अशोकने त्यांच्या मृतदेहांना जमिनीत पुरलं. मात्र, मुलींच्या आईला सहन झालं नाही. मुलीच्या आईने पोलिसांत या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचून जमिनीतून मृतदेह बाहेर काढले.

crime news
DA hike 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, मोदी सरकारकडून गुढीपाडव्याची गोड भेट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुळ्या मुलींची हत्या करणाऱ्या आरोपी अशोक कुमार यादवला अटक करण्यात आलं आहे. पोलिसांकडून त्याची चौकशी सुरु आहे. अनिता यादव असे मुलींच्या आईचे नाव आहे. पाच महिन्यांपूर्वी अनिता यादव यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. जुळ्या मुलींना पाहून अशोक नाराज व्हायचा.

अनिता यादव यांनी सांगितलं की, अशोकसोबत ११ नोव्हेंबर २०१६ साली लग्न झालं होतं. जुळ्या मुली झाल्यानंतर नवरा आणि सासू टोमणे मारायची. २७ मार्च रोजी अशोकसोबत भांडण झालं. त्यानंतर अशोकने जुळ्या मुलींना जमिनीवर आपटून ठार मारलं.

crime news
Prashant koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरवर वकिलाचा हल्ला; कोर्टाबाहेरील थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

मुलींची हत्या केल्याचे पाहून आई रडून रडून बेहाल झाली. अशोकने दोन्ही मुलींचा मृतदेह जमिनीत पुरला. बायकोने नवऱ्याचा भंडाफोड केला. मुलींची हत्या करणाऱ्या अशोकवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी अनिता यांनी पोलिसांकडे केली. दोन्ही मुलींच्या हत्येनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी अशोकच्या कृत्याने स्थानिक नागरिकही चकीत झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com