Prashant koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरवर वकिलाचा हल्ला; कोर्टाबाहेरील थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Prashant koratkar News :प्रशांत कोरटकरवर वकिलांचा हल्ला झाल्याची घटना घडली. कोर्टाबाहेरील हल्ल्याचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Prashant koratkar News
Prashant koratkar Saam tv
Published On

कोल्हापूर : कोल्हापुरातून मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापुरात कोर्टातील सुनावणी झाल्यानंतर आरोपी प्रशांत कोरटकरवर वकिलाने हल्ला केला. वकिलाने हल्ला केल्यानंतर प्रशांत कोरटकरला पोलीस, सुरक्षा दलाच्या जवानांनी घेरलं. घटनेनंतर पोलिसांनी हल्ला करणाऱ्या वकिलाला ताब्यात घेतलं आहे. प्रशांत कोरटकरवर हल्ला झाल्यानंतर कोर्टात खळबळ उडाली.

प्रशांत कोरटकरला आज शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात आणलं होतं. यावेळी कोर्टात पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. मोठ्या पोलीस बंदोबस्तात प्रशांत कोरटकरला कोर्टात आणलं. कोर्टात सुनावणीसाठी सरकारी पक्षातर्फे वकील सूर्यकांत पोवार तर इंद्रजीत सावंत यांच्यातर्फे वकील असीम सरोदे हे ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते.

Prashant koratkar News
Bengaluru Murder case : पुण्याचं जोडपं, बेंगळुरुत सुटकेस हत्याकांड; मध्यरात्री नेमकं काय घडलं? घटनाक्रम वाचा

प्रशांत कोरटकरच्या तर्फे सौरभ घाग हे प्रत्यक्ष वकील म्हणून उपस्थित होते. कोर्टात प्रशांतला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. प्रशांत कोरटकरला ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मात्र, पोलिसांनी पाच दिवसांची कोठडी सुनावली होती.

Prashant koratkar News
Shocking : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीचा १४ मिनिटांचा प्रायव्हेट व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

कोर्टाने कोठडी सुनावल्यानंतर त्याला पोलीस कोठडीत नेले जात होते. त्याचवेळी कोर्टात वकिलाने प्रशांत कोरटकरला पायताणाने मारण्याचा प्रयत्न केला. प्रशांत कोरटकरवर हल्ला झाल्यानंतर कोर्टाबाहेर एकच धावाधाव झाली. वकिलाने हल्ला केल्यानंतर पोलिसांनी तातडीने कोरटकरला घेरलं. तर पोलिसांनी हल्ला करणाऱ्या वकिलाला ताब्यात घेतलं.

Prashant koratkar News
Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

कोर्टासमोर तू तू मैं मैं

कोर्टासमोर इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे आणि कोरटकरचे वकील सौरभ घाग यांच्यात कोर्टासमोर तू तू मैं मैं झाली. दोघांनी एकमेकांना शांत बसा असा दम भरला. प्रशांत कोरकटरवर भाष्य करताना असीम सरोदे म्हणाले, 'कोरटकर हा खोटारडा आहे. तो पुरावे नष्ट करणारा आहे. प्रशांत कोरटकरला सोडून चालणार नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com