Indrajeet Sawant: इंद्रजित सावंत धमकी प्रकरण, फॉरेन्सिक टीमकडून ७ तास चौकशी

Indrajit Sawant Threat Case: प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं आक्षेपार्य विधान आणि इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फॉरेन्सिक विभागाकडून चौकशी सुरू आहे.

इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोनवरून दिलेल्या धमकी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. इंद्रजित सावंत यांची फॉरेन्सिक विभागाकडून तब्बल ७ तास चौकशी करून माहिती संकलित करण्यात आली. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फॉरेन्सिक विभागाकडून रात्री उशिरा माहिती घेण्याचे काम पूर्ण झाले. प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं आक्षेपार्य विधान आणि इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फॉरेन्सिक विभागाकडून चौकशी सुरू आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने फॉरेन्सिक विभागाकडून इंद्रजीत सावंत यांच्या मोबाईलमधील कोरटकर यांच्यासोबत झालेला संवाद आणि सावंत यांच्या आवाजाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना प्रशांत कोरटकर यांनी व्हाट्सअप कॉलवरून जी धमकी दिली होती या संदर्भातला तपास आता फॉरेन्सिक टीमकडून सुरू करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलिस दलाच्या फॉरेन्सिक टीमकडून आवाजाचे नमुने घेण्याचं काम सुरू करण्यात आले आहे. सध्या या प्रकरणी कोल्हापूरनंतर आता नागपूरमध्ये देखील प्रशांत कोरटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या कोल्हापूर पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com