Indrajeet Sawant Historian : छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होते की धर्मरक्षक? इंद्रजित सावंत म्हणतात...

छत्रपती संभाजी महाराजांवरून सुरू असलेल्या वादावर इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी मोठं भाष्य केलं आहे.
Indrajeet Sawant Historian
Indrajeet Sawant Historian Saam Tv
Published On

रणजीत माजगांवकर

Indrajeet Sawant News : राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. छत्रपती संभाजी महाराज धर्मरक्षक होते की, स्वराज्यरक्षक? यावरून राज्याचे वातावरण चांगलंच तापलं आहे. या वादावर इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी मोठं भाष्य केलं आहे. (Latest Marathi News)

Indrajeet Sawant Historian
Jitednra Awhad : जितेंद्र आव्हाड संभाजी महाराजांवरील वादावरून सत्ताधाऱ्यांवर बरसले; म्हणाले,'हिंमत असेल तर...'

छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते की धर्मरक्षक होते, या प्रश्नाला उत्तर देताना इंद्रजित सावंत म्हणाले,'शिवछत्रपती राज्याभिषेक करून घेतल्यानंतर क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती पदवी लावून घेतली. त्यानंतर क्षत्रिय कुलावंतास राजा शंभू छत्रपती अशी पदवी छत्रपती संभाजी महाराज यांनी देखील तशीच ठेवली. पुढे राजाराम महाराजांनी सुद्धा तशीच पदवी ठेवली. आतापर्यंतच्या सर्व छत्रपतींनी त्याचं अनुकरण केलं', असे इंद्रजीत सावंत पुढे म्हणाले.

'धर्मरक्षक, धर्मवीर, स्वराज्यरक्षक या सर्व पदव्या नंतर लावल्या गेल्या आहेत. शहाजी महाराज हे संकल्प स्वराज्य निर्माते होते. तर स्वराज्याचे रक्षण कोणी केलं तर, ते शंभुराजे आणि त्यानंतर राजाराम महाराजांनी केलं. त्यामुळे त्यांना स्वराज्यरक्षक म्हणू शकतो', असे पुढे ते म्हणाले.

'संभाजी महाराज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र धर्मवीर होते. धर्मवीर आले कुठून तर तुम्ही जर अभ्यास केला तर संभाजी महाराजांच्या काळापासूनच त्यांचं चरित्र विकृत करायचे कारस्थान इथल्या इतर त्यांच्याबरोबर असणारे अण्णाजी दत्तो आणि इतर मंडळींनी केलं. त्याचबरोबर संभाजी महाराजांना विष घालून मारायचा प्रयत्न करण्यात आला, असे इंद्रजीत सावंत पुढे म्हणाले.

संभाजी महाराजांनी राजा झाल्यानंतर सुद्धा ब्राह्मण असणाऱ्या अण्णाजी दत्तोला हत्तीच्या पायी दिलं. यामुळे त्यांच्या वारसांनी शंभुराजांच्या त्या कृत्याचा राग मनात धरला आणि त्याच्यानंतर आजपर्यंत शंभूराजांची बदनामीची केंद्र चालवली, असेही ते म्हणाले.

'संभाजी महाराजांच्या बद्दल भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ज्या वेळेला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रेरणेने आपल्या वासी बेंद्रे साहेब, कमल गोखले आणि डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी संभाजी महाराजांच्या चरित्राचे अभ्यास केला. नव्याने इंटरप्रिटेशन केलं. त्यानंतर सर्व बदनामी खोडून काढली, असेही सावंत म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com