Jitednra Awhad : जितेंद्र आव्हाड संभाजी महाराजांवरील वादावरून सत्ताधाऱ्यांवर बरसले; म्हणाले,'हिंमत असेल तर...'

'हिंमत असेल तर राज्यापालांवर बोला, असा टोला आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.
Jitendra Awhad
Jitendra Awhad Saam Tv

Jitendra Awhad News : राज्यातील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. अजित पवारांवर टीका करण्याऱ्यांना राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

'हिंमत असेल तर राज्यापालांवर बोला, असा टोला आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

Jitendra Awhad
Sambhajiraje on Ajit Pawar : अजितदादांच्या वक्तव्यावर काय म्हणाले संभाजीराजे ?, पाहा सविस्तर बातमी

जितेंद्र आव्हाड म्हणाले, संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते. महाराष्ट्र धर्म मराठा धर्म तत्कालीन इतिहासात सांगितलं गेलं आहे. संभाजी महाराजांच्या मागे लेबल राजकीय दुकानात विकणाऱ्यांनी इतिहास बघा'.

'छत्रपती संभाजी महाराज यांना सर्वात जास्त बदनाम कोणी केलं हे सर्वांना माहित आहे. एकीकडे क्रूर सुलतानाविरोधात लढले. तरी तत्कालीन आणि समकालीन इतिहासात त्यांना धर्मवीर संबोधित केले नाही. एम. एस. गोवळकर यांना मिया गोवळकर म्हणायचं का? सावरकर यांना मिया सावरकर म्हणायचं का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना केला .

'नरेंद्र पवार यांनी हे वाचल्यावर थोबाडीत मारून घ्यावी. मराठे ही जात नाही , मराठा ही व्यापक संकल्पना आहे. हिंमत असेल तर राज्यापालांवर बोला, असा टोला आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

काय म्हणाले होते अजित पवार?

अजित पवार म्हणाले होते, 'आपण महाराष्ट्रामध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही.'बाल शौर्य पुरस्कार' हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी द्यावा. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते,धर्मवीर नव्हते.त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com