Supreme Court : एक झाड, एक लाख रुपये वसूल करा! झाडे तोडणे मानवी हत्येपेक्षाही भयंकर, सुप्रीम कोर्ट संतापलं

Supreme Court on tree cutting : झाडे तोडणे मानवी हत्येपेक्षाही भयंकर असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. झाडे तोडण्याच्या कृत्यावरून सुप्रीम कोर्टाने संताप व्यक्त केला आहे.
Supreme Court News
Supreme Court Saam tv
Published On

सुप्रीम कोर्टाने झाडे तोडणाऱ्या व्यक्तीविरोधात मोठा संताप व्यक्त केला आहे. 'मोठ्या संख्येने झाडे तोडणे हे मानवी हत्येपेक्षा भयंकर कृत्य असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. पर्यावरणाला नुकसान पोहोचवणाऱ्यांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही. बेकायदेशीररित्या तोडलेल्या प्रत्येक झाडामागे एक लाख रुपये दोषी व्यक्तीकडून वसूल करण्याचा सूचना सुप्रीम कोर्टाने दिल्या आहेत.

Supreme Court News
Railway Service Disruption : रेल्वे वाहतूक विस्कळीत; ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतुकीवर परिणाम, प्रवाशांचा खोळंबा, VIDEO

न्यायाधीश अभय एस ओका आणि न्यायाधीश उज्जल भुइंया यांच्या पीठाने झाडे तोडण्याची तुलना मानवी हत्येशी केली आहे. बेकायदेशीररित्या झाडे तोडणे आणि पर्यावरणाचं नुकसान पोहोचवणाऱ्या व्यक्ती दया दाखवू नका, असे सुप्रीम कोर्टाच्या पीठाने म्हटलं. दोषी व्यक्तीने एकूण ४५४ झाडे तोडले होते.

Supreme Court News
Supriya Sule : 'मी पारदर्शक आयुष्य जगते; देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना सुप्रिया सुळेंकडून प्रत्युत्तर, VIDEO

'४५४ झाडे तोडलेल्या व्यक्तीचा गुन्हा हलक्यात घेऊ नका, असे कोर्टाने म्हटलं आहे. शिवशंकर अग्रवाल नावाच्या व्यक्तीने मथुरा-वृंदावनमधील डालमिया फार्ममधील ४५४ झाडे तोडण्याचा गुन्हा केला होता. वरिष्ठ अधिवक्त मुकुल रोहतगी यांनी म्हटलं की, 'शिवशंकर अग्रवाल यांनी त्यांची चुकी मान्य केली आहे. मात्र, कोर्टाने दंडाची रक्कम कमी करण्यास नकार दिला आहे'.

Supreme Court News
Prashant Koratkar : फरार कोरटकर, कुणाचं पाप? प्रशांत कोरटकरच्या लपाछपीमागे काँग्रेस कनेक्शन? पाहा स्पेशल रिपोर्ट

न्यायाधीश अभय एस ओका आणि न्यायाधीश उज्जल भुइया यांच्या पीठाने ४५४ झाडे तोडणाऱ्या व्यक्तीची याचिका फेटाळून लावली. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने संताप व्यक्त केला. 'व्यक्तीने परवानगीशिवाय ४५४ झाडे तोडली. आता ती झाडे नव्याने लावण्या कमीत कमी १०० वर्ष लागतील.

सुप्रीम कोर्टाने केंद्रीय अधिकार प्राप्त समितीचा रिपोर्ट स्वीकारला आहे. मथुरा-वृंदावन येथील दालमिया फार्ममधील झाडे तोडणाऱ्या शिवशंकर अग्रवाल यांना प्रत्येक झाड तोडण्यामागे १ लाख रुपये दंड ठोठावण्याची शिक्षा रिपोर्टमध्ये नोंद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com