Eknath Shinde Song : 'ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी...; कामराला शिंदे गटाचा जबरा उत्तर, उद्धव ठाकरेंवरही बाण, VIDEO

Eknath Shinde Latest News : कुणाल कामराच्या गाण्याला शिंदे गटाकडून उत्तर देण्यात आलं आहे. या गाण्यातून उद्धव ठाकरेंवरही अप्रत्यक्ष टीका करण्यात आली आहे.
Eknath Shinde News
Eknath Shinde SongSaam tv
Published On

Eknath Shinde Song : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने विडंबनात्मक गाण्यातून एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता. कुणाल कामराच्या टीकेमुळे राजकारण चांगलंच तापलंय. कुणाल कामराच्या विरोधात पोलिसांत तक्रारही नोंदवण्यात आल्या. गाण्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड केली होती. राज्यभरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कुणाल कामराच्या विरोधात आंदोलनही सुरु आहेत. दुसरीकडे कुणाल कामराच्या गाण्याला आता शिंदे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदेंवरील नवं गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.

Eknath Shinde News
Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

कुणाल कामराने मुंबईच्या खारमधील हॅबिटेट स्टुडिओमध्ये शो केला होता. वादानंतर पालिकेने या स्टुडिओवर कारवाई केली. या स्टुडिओवर कारवाई करण्यासाठी आता महापालिकेने दुसरे समन्स बजावलं आहे. स्टुडिओवर कारवाई होणार का, याचा निर्णय शेवटच्या आठवड्यात होणार आहे.

Eknath Shinde News
Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या राय बच्चनच्या कारला अपघात, बेस्ट बसने दिली धडक

कुणाल कामराचा 'नया भारत'चा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कुणाल कामराने शोमधील एका गाण्यात एकनाथ शिंदे यांना 'गद्दार' असं म्हटलंय. यानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये भडका उडाला. शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त होऊन हॅबिटेट स्टुडिओ तोडफोड केली. या तोडफोडीवर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. 'तोडफोडीचं समर्थन नाही.पण प्रत्येक कृतीची प्रतिक्रिया असते, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं.

कुणाल कामराच्या गाण्यावरून सोशल मीडियात राजकीय युद्ध सुरु झालं आहे. टी-सीरीजच्या गाण्याचे धून वापरल्याबद्दल कामरावर युट्यूबने कारवाई केली आहे. कामराचा हा व्हिडिओ युट्यूबवरून काढला जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे कुणाल कामराला शिंदे गटानेही गाण्यातून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Eknath Shinde News
Maharashtra Rain : पश्चिम महाराष्ट्र, कोकणाला पावसाचा तडाखा; जगाच्या पोशिंद्याला फटका, राज्यातील अवकाळी पावसाच्या घडामोडी एका क्लिकवर

शिंदे गटाकडून तयार करण्यात आलेल्या गाण्यातून हिंदूत्वच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधण्यात आला आहे. गाण्यातून घराणेशाहीवरही टीका करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यावरील गाण्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात तयार केलेल्या गाण्याला ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर दिलं जाईल, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com