Kunal Kamra : मला अटक होईल, माझ्या जीवाला धोका, कुणाल कामराची हायकोर्टात धाव

Kunal Kamra Court News : कुणाल कामरा याने मद्रास हायकोर्टात धाव घेतली आहे. मुंबईमध्ये गेलो तर मला अटक होईल, माझ्या जिवाला धोका आहे, असे कुणाल कामरा याने हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
Kunal Kamra news
kunal kamra Saam tv
Published On

Kunal Kamra Eknath Shinde Controversy : आंतरराज्य अटक टाळण्यासाठी कुणाल कामरा याने मद्रास हायकोर्टात धाव घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं केल्यामुळे कामराच्या अडचणी वाढल्या आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कामरा याला फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली. इतकेच काय तर शिवसेनेच्या नेत्यांनीही कामराला इशारा दिला होता.

शिवसेना आमदार आणि कार्यकर्त्यांनी कामराच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांकडून कुणाल कामरा याला दोन नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. अटक होण्याची शक्यता असल्यामुळे कुणाल कामरा याने मद्रास हायकोर्टात धाव घेतली आहे. माझ्या जिवाला धोका आहे, असे कोर्टात दाखल केलेल्या याचिकामध्ये कामरा याने म्हटले आहे.

Kunal Kamra news
Kunal Kamra:'सैलरी चुराने साड़ी वाली दीदी आई', उपमुख्यमंत्री शिंदेंनंतर कुणाल कामराचा अर्थमंत्री सितारमण यांच्यावर निशाणा

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिप्पणी केली होती. त्यानंतर मोठा दगारोळ उडाला. मुंबईसह दिल्लीमध्ये संताप व्यक्त करण्यात आला होता. वादात सापडलेल्या कुणाल कामरा याने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कुणाल कामरा यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल झालेलया गुन्ह्यामध्ये जामिनाची मागणी केली आहे.

Kunal Kamra news
Kunal Kamra Video: धन्यवाद कुणाल कामरा! व्हिडिओ पोस्ट करत मनसे नेत्याची सरकारवर टीका

शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीनंतर कामराविरुद्ध झिरो एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यानंतर ती मुंबईतील खार पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आली. एफआयआरमध्ये कलम 353(1)(बी), 353(2) (सार्वजनिक उपद्रव) आणि 356(2) (मानहानी) वापरण्यात आले आहेत. दरम्यान, कुणाल कामरा यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. कामरा सध्या तामिळनाडू येथे आहे, असे वकिलाने मद्रास कोर्टात सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com