Kunal Kamra:'सैलरी चुराने साड़ी वाली दीदी आई', उपमुख्यमंत्री शिंदेंनंतर कुणाल कामराचा अर्थमंत्री सितारमण यांच्यावर निशाणा

Kunal Kamra Video On Nirmala Sitharaman : स्टँडअप कॉमेडियन कुमाल कामराने आता अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्यावर निशाणा साधलाय. कामराने गाण्याचा एक नवीन व्हिडिओ शेअर करत अर्थमंत्र्यांवर टीका केलीय.
Kunal Kamra
Kunal Kamra New VideoSaam Tv
Published On

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने आता अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्यावर निशाणा साधलाय. कामराने आज एक नवा व्हिडिओ शेअर केलाय. यात त्याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना 'सॅलरी चोरणारी दिदी' असं म्हटलंय. हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये केलेल्या कार्यक्रमाचाच हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे.

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना 'साडीवाली दिदी' म्हणत कामराने त्यांच्या आर्थिक धोरणांवर टीका केलीय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर व्हिडिओ केल्यानंतर कुणाल कामरा वादात सापडलाय. गाण्यातून शिंदेंवर टीका केल्याने शिवसैनिकांकडून त्याला धमकी दिली जात आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंवर केलेला व्हिडिओची चर्चेत असताना त्याच्या नवीन व्हिडिओची क्लिप व्हायरल होत आहे. अर्थमंत्र्यांवर टीका करणारा व्हिडिओ दीड मिनिटांचा आहे.

Kunal Kamra
Kunal Kamra Controversy : सलग दुसऱ्या दिवशी कामराच्या शोच्या सेटवर BMC ची कारवाई, गॅस कटरनं स्टुडिओचं बांधकाम तोडलं

हिंदी चित्रपटातील 'हवा हवाई' गाण्यावरून कुणाल कामराने अर्थमंत्र्यांच्या आर्थिक धोरणांवर टीका केलीय. दरम्यान उपमुख्यमंत्र्यांवर विडंबनात्मक काव्य करत त्यांच्यावर टीका करण्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा कामराला नोटीस दिलीय. याआधीही मंगळवारी त्याला नोटीस बजावण्यात आली होती. रविवारी एका कार्यक्रमात कामराने उपमुख्यमंत्री शिंदेंचं नाव न घेता 'देशद्रोही', 'ठाणे की रिक्षा' अशी टीका केली होती. या कार्यक्रमानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली होती. त्यानंतर पुन्हा एक गाण्याचा व्हिडिओ व्हायरल करत कामराने शिवसेना आणि सरकारला डिवचलं होतं.

Kunal Kamra
Kunal Kamra : कुणाल कामराने पुन्हा शिंदेंच्या कार्यकर्त्यांना डिवचलं, म्हणाला भाजपच्या लोकांना पण...

कामरावर काय म्हणाले उपमुख्यमंत्री शिंदे

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते, 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण मर्यादा असली पाहिजे.' कुणाल कामराने 'दिल तो पागल है' या चित्रापटातील 'भोली सी सूरत' या गाण्यावर विडंबनात्मक गाणे तयार केलं होतं. या गाण्यात त्याने एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. कामराने कोणाचंही नाव घेतलं नाही, पण ज्या पद्धतीने त्याने दाढी, ठाणे आणि रिक्षा असे शब्द वापरले त्यावरुन त्याचा रोख एकनाथ शिंदे यांच्याकडे होता.

यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिलीय. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर होत असल्याचं शिंदे म्हणाले होते. दरम्यान, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झालीय. नाशिकच्या मनमाड पाठोपाठ नांदगाव पोलिसात आता दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना शहर नांदगाव यांच्यावतीने हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com