DA hike 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, मोदी सरकारकडून गुढीपाडव्याची गोड भेट

dearness allowance increase : सरकारी कर्मचाऱ्यांना गुढी पाडव्याची गोड भेट दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे.
dearness allowance increase
DA hike 2025 Saam tv
Published On

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. गुढी पाडवाच्या दोन दिवसआधीच सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना गोड बातमी दिली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.

केंद्र सरकारची कॅबिनेट आज शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झाली. या कॅबिनेटमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महगाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात महागाई भत्ता आणि महागाई सवलत जोडला जाणार आहे. कॅबिनेटमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार मागील तीन महिन्यांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत थकबाकी एकत्र मिळणार आहे.

dearness allowance increase
DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दोन दिवसांत महागाई भत्ता वाढणार; पगारात इतकी होणार वाढ

कॅबिनेटच्या निर्णयामुळे १ कोटींहून अधिकारी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे. सरकारने ही घोषणा १५ ते २० दिवस उशीरा केली आहे. त्यामुळे तीन महिन्यांचा महागाई भत्ता एकत्र एप्रिल महिन्यात मिळणार आहे.

dearness allowance increase
Shaktikanta Das : मोठी बातमी! माजी गर्व्हनर शक्तिकांत दास यांना PMOमध्ये महत्वाची जबाबदारी, वाचा

सरकार महागाई भत्त्याची घोषणा होळी आणि दिवाळीच्या आधी करत असतं. मात्र, यंदा जानेवारी-जूनच्या महागाई भत्ता वाढीची घोषणा होळीच्या आधी केली जोता. मात्र, सरकारने महागाई भत्ता वाढीची घोषणा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केली. महागाई भत्यात मागील सात वर्षांतील सर्वात कमी वाढ केली आहे. सरकारकडून महागाई भत्त्यात साधारण कमीत कमी ३ टक्के ते ४ टक्के वाढ केली जाते. यंदा महागाई भत्यात २ टक्के दरवाढ केली आहे.

dearness allowance increase
Umpires Salary: IPL मध्ये अंपायर्सला किती पगार मिळतो?

सरकारच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानं कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ५३ टक्क्यांहून ५५ टक्के झाला आहे. पेन्शन धाराकांसाठी महागाई सवलतीत वाढ करण्यात आली आहे. उदा. सरकारी कर्मचाऱ्याचं मूळ वेतन १८००० रुपये असेल. तर त्यांना महिना ३६० रुपये महागाई भत्ता मिळेल. त्यामुळे कर्मचाऱ्याला वार्षिक ४३२० रुपये महागाई भत्ता मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com