DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दोन दिवसांत महागाई भत्ता वाढणार; पगारात इतकी होणार वाढ

Government Employees: येत्या बुधवारी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. केंद्र सरकारने या दिवशी महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Central Government Employees
DA HikeSaam Tv
Published On

केंद्र सरकारने येत्या बुधवारी म्हणजेच १२ मार्च रोजी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत वाढ करणार असल्याचे जाहीर केले आहे. सरकारच्या या निर्णयाने १.२ करोडहून अधिक कर्मचारी वर्गाला आणि पेंशनधारकांना मोठा फायदा होणार आहे. येत्या बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यानंतर महागाई भत्त्यात एकूण किती टक्यांनी वाढ होणार हे जाहीर करण्यात येणार आहे. सरकारी कर्मताऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून २ वेळेस वाढवला जातो.

Central Government Employees
Post Office: महिलांसाठी सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा आणि मिळवा दुप्पट परतावा

महागाई भत्ता कधी लागू होणार?

सरकारी कर्मचाऱ्यांचा हा भत्ता १ जानेवारी आणि १ जुलैपासून वाढवला जातो. यात सरकारने कोणत्याही दिवशी ही घोषणा केली तरी याची अमंलबजावणी या दोन दिवशीपासूनच केली जाते. केंद्र सरकार यात दोन ट्क्क्यांनी महागाई भत्ता वाढवण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आता २ टक्के वाढवून मिळण्याची शक्यता आहे.

Central Government Employees
Post Office scheme: पोस्टाची खास योजना! व्याजातूनच व्हाल मालामाल, कमाई होईल लाखोंची, कसं ते जाणून घ्या

सरकार महागाई भत्ता किती टक्यांनी वाढणार?

वाढत्या महागाईच्या दरानुसार हा भत्ता 2% वाढवण्याची शक्यता आहे. सध्या महागाई भत्ता 53% आहे. यामध्ये जर दोन टक्के वाढ करून सरकारी कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. याचा शेवटचा निर्णय येत्या बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षखाली होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेणार आहेत. याआधी महागाई भत्त्याची वाढ ऑक्टोबर २०२४ मध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आला होता. तेव्हा त्यात 3% वाढवण्यात आले होते.

केंद्र सरकार दरवर्षी १ जानेवारी आणि १ जुलै रोजी महागाई भत्त्यात सुधार करतं. मात्र याची घोषणा मार्च आणि सप्टेंबरला केली जाते. २००६ मध्ये केंद्र सरकारने महागाई भत्त्याच्या मोजणीसाठी नविन नियम आणि फॉर्मुला लागू केला होता. त्यामुळे याची योग्य वाढ आणि टक्क्यांतची सरासरी काढण्यात येऊ लागली. त्यात आठवे वेतन केंद्र सरकार आयोगाने घोषित केले होते. त्यामुळे लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. याची अमंलबजावणी २०२६ सालापासून लागू होणार अशी शक्यता आहे.

Edited By: Sakshi Jadhav

Central Government Employees
PF चे पैसे ATM मधून कसे काढायचे? जाणून घ्या पद्धत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com